दिल दिया गल्ला या गाण्यावर ‘सलमान खान’सोबत शहनाज गिलचा जबरदस्त डान्स

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Dec 09, 2022 | 3:28 PM

आजही लोक बिग बाॅसच्या घरामध्ये शहनाजला मिस करतात.

दिल दिया गल्ला या गाण्यावर 'सलमान खान'सोबत शहनाज गिलचा जबरदस्त डान्स

मुंबई : शहनाज गिल ही बिग बाॅस 13 मध्ये सहभागी झाली होती. शहनाजला खरी ओळखी ही बिग बाॅसमधूनच मिळालीये. बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यावर शहनाजच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झाली. शहनाज आणि सिध्दार्थ शुक्ला यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. बिग बाॅसच्या घरात शहनाजने धमाल केली. आजही लोक बिग बाॅसच्या घरामध्ये शहनाजला मिस करतात. बिग बाॅसच्या घरामधून बाहेर पडल्यानंतर शहनाजला बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. सलमान खानसोबतचा तिचा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

बिग बाॅस 16 चे सीजन सध्या सुरू असून हे सीजन टीआरपीमध्ये धमाका करत आहे. सलमान खान बिग बाॅस 16 ला होस्ट करत असून आता शहनाज गिल ही बिग बाॅसच्या मंचावर आलीये. इतकेच नाही तर शहनाज सलमान खानसोबत मस्ती करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शहनाज ही तिच्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी बिग बाॅसच्या मंचावर आलीये. यावेळी ती सलमान खानसोबत धमाल करते. इतकेच नाही तर पंजाबीमध्ये माझी तारीफ करा, असे शहनाज सलमान खान याला म्हणते.

विशेष म्हणजे सलमान खान देखील शहनाज गिलची तारीफ ही पंजाबीमध्ये करतो. शहनाजला पाहून सलमान खान म्हणतो की, बिग बाॅस सीजन 13 मध्ये तू पंजाबी सूट घालून कशी घाबरत घाबरत मंचावर आली होती. ते तुला आठवते का? हे ऐकल्यावर भाईजान म्हणत शहनाज सलमानच्या गळ्याला पडते.

दिल दिया गल्ला या गाण्यावर शहनाज सलमान खानसोबत डान्स करते. शहनाज सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी शहनाज कायमच बोल्ड फोटोशूट करते. आता शहनाजचे घनी सयानी हे नवे गाणे रिलीज होणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI