Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा क्लास घेताना परत भाईजान दिसणार
सलमान खानप्रमाणेच करण जोहरने देखील घरातील सदस्यांचा जोरदार क्लास घेतला. यावेळी गाैतम आणि गोरी करणच्या निशाण्यावर होते.

मुंबई : बिग बॉसचे 16 वे सीजन चर्चेत आहे. स्पर्धकांचा घरात जोरदार हंगामा बघायला मिळतोय. साजिद खानमुळे या सीजनला खास महत्व आले असून बाहेर वादही सुरू आहेत. गेल्या आठवड्यात विकेंड का वारला करण जोहरने होस्ट केले. या आठवड्यातील विंकेडच्या वारला कोण होस्ट करणार? हा प्रश्न चाहत्यांसमोर उभा आहे. कारण सलमान खानला डेंग्यू झाल्याने सलमान ऐवजी करण जोहरने विकेंडच्या वारला होस्ट केले होते.
सलमान खानप्रमाणेच करण जोहरने देखील घरातील सदस्यांचा जोरदार क्लास घेतला. यावेळी गाैतम आणि गोरी करणच्या निशाण्यावर होते. सध्या बिग बाॅसच्या घरात अनेक घडामोडी घडत आहेत. सलमान खानचे चाहते विकेंडच्या वारची नेहमीच आतुरतेने वाट बघतात. इतकेच नाही तर शोचा टीआरपी नेहमी विकेंडच्या वारला वाढतो.
View this post on Instagram
डेंग्यू झाल्याने मागच्या आठवड्याच्या विकेंडच्या वारला सलमान खान दिसला नाही. मात्र, येणाऱ्या विकेंडच्या वारमध्ये सलमान दिसणार असल्याची माहिती मिळत आहे. विकेंडच्या वारची शूटिंग आजच सलमान खान करणार आहे. कारण सलमान शिवाय विकेंडच्या वारला खास मजा येत नाही.
डेंग्यूमधून सलमान खान बरा झाल्याची माहिती देखील मिळत आहे. नुकताच सलमान आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला होता. मात्र, बिग बाॅसच्या शूटिंगनंतर पुढील काही दिवस सलमान खान आराम करणार असल्याचे देखील कळते आहे. डेंग्यू झाल्याचे समजल्यानंतर सलमान खानने चित्रपटांसह बिग बाॅसचे शूटिंग देखील थांबवले होते.
