AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi Season 5: सूरजची बहीण सीता हिने केले मोठे विधान म्हणाली, महाराष्ट्र या सर्वांनाच…

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner 2024: कोण जिंकणार हे मी सांगू शकत नाही. स्पर्धेतील सर्वच जण चांगले खेळले आहे. महाराष्ट्राने या सर्वांना प्रेम दिले. परंतु मला वाटते सूरज जिंकू शकतो, कारण त्याच्या पाठीमागे आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत.

Bigg Boss Marathi Season 5: सूरजची बहीण सीता हिने केले मोठे विधान म्हणाली, महाराष्ट्र या सर्वांनाच...
suraj chavan
| Updated on: Oct 07, 2024 | 10:11 AM
Share

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा रविवारी फिनाले झाला. या संपूर्ण सीजनबद्दल मराठी चाहत्यांमध्ये चांगली क्रेझ होती. या सीजनमध्ये वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांच्यासारखे बडे कलाकार सहभागी झाले. या शोमध्ये सूरज चव्हाण चांगला चर्चेत होता. रविवारी झालेल्या फिनालेमध्ये रितेश देशमुख याने चार स्पर्धकांच्या परिवारासोबत चर्चा केली. त्यावेळी सूरज चव्हाण याची बहीण सीता हिने जे बोलले त्याने संपूर्ण महाराष्ट्रातील चाहते आनंदीत झाले. निखळ, निकोप स्पर्धा कशी हवी, स्पर्धकाबाबत कशा पद्धतीने बोलवे तो आदर्श ग्रामीण भागातील सीताने आखून दिला.

काय म्हणाली सूरज चव्हाणीची बहीण

जेव्हा रितेश देशमुख याने सूरज चव्हाणची बहीण सीता हिला स्पर्धेत सूरज चव्हाण जिंकणार का? असा प्रश्न विचारला, तेव्हा सीता म्हणाले, कोण जिंकणार हे मी सांगू शकत नाही. स्पर्धेतील सर्वच जण चांगले खेळले आहे. महाराष्ट्राने या सर्वांना प्रेम दिले. परंतु मला वाटते सूरज जिंकू शकतो, कारण त्याच्या पाठीमागे आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत.

बारामतीकर सूरजच्या बहिणीने मने जिंकली

सर्वसामान्य कुटुंबातील सूरज चव्हाण फक्त सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर आला. सुरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इनफ्लून्सर आहे. सोशल मिडियाने त्याला प्रकाश झोतात आणले. मराठी बिग बॉस सिझन 5 पर्यंत त्याने मजल मारली. त्याचा जन्म 1994 साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणीने केला. त्याच बहिणी फिनालेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली.

लहानपणीच सुरजचे आई वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे घरात अठराविश्व दारिद्रय होते. घर चालवण्याची जबाबदारी सूरजवर आली. तो मजुरी करु लागला. त्याला दिवसाला 300 रुपये मजुरी मिळत होती. शालेय शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.