निक्की अन् आर्या भिडल्या; जान्हवी किल्लेकर म्हणाली, माझ्या डोक्यात गेलं तर…
Janhavi Killekar and Nikki Tamboli Conflict : बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद होताना दिसतो. निक्की अन् आर्या भिडल्याचं पाहायला मिळालं. निक्की तांबोळी आणि आर्या किल्लेकर यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. जान्हवी किल्लेकर काय म्हणाली? वाचा सविस्तर...
‘बिग बॉस मराठी’ च्या घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. या आठवड्याचं कॅप्टन्सी कार्य पार पडलं. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे पहिलं कॅप्टनसी कार्य झालं. पहिल्या ‘कॅप्टनसी टास्क’ दरम्यान घरातील सदस्य प्लॅनिंग करताना दिसले ‘कॅप्टनसी’ च्या सीटचा प्रश्न असल्याने घरातील सदस्य कमाल गेम प्लॅन करून खेळताना दिसले. कॅप्टनसीसाठी अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीचे एकमेकांसाठी वेगळे प्लॅन होते. तर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरने देखील तिचा प्लॅन ठरवला होता. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ या टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरात वाद झाले. निक्की तांबोळी आणि आर्या किल्लेकर भिडल्याचं दिसलं.
निक्की आणि जान्हवीमध्ये वाद
अरबाज आणि निक्की कॅप्टनसीसाठी निखिलचा सपोर्ट मागितला. निखिलदेखील अरबाजला फुल ऑन सपोर्ट करायला तयार झाला. हा टास्क अंकिता प्रभू वालावालकर हिने जिंकला. एकंदरीतच पहिल्याच टास्कदरम्यान घरात धमाका झाला. या टास्कदरम्यान निक्की अन् आर्या भिडल्याचं दिसलं. या दोघींमध्ये जोरदार वाद झाला.
तर सोडणार नाही- जान्हवी
बिग बॉस मराठी नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. माझी सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झाली आहे. मी माझ्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राची खलनायिका ही एक टॅगलाईन झाली आहे. मी आता हिरोईन वगैरे काही करूच शकत नाही. आता तुम्ही मला सगळे पाहाल की जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे ते, असं जान्हवी म्हणाली.
मी घरात कसलीही प्लॅनिंग करून चालले नाही कारण आपण करतो एक आणि वास्तवात होत एक म्हणून मी काही तयारी केली नाही. मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही, असं जान्हवीने म्हणाली.