AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jivachi Hotiya Kahili: कोल्हापुरी मुलगा अन् कानडी मुलीची अनोखी प्रेमकहाणी; राणादाच्या भावाची नवी मालिका

मुख्य कलाकरांबरोबरच आकर्षण ठरले आहेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. विद्याधर जोशी आणि अतुल काळे हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Jivachi Hotiya Kahili: कोल्हापुरी मुलगा अन् कानडी मुलीची अनोखी प्रेमकहाणी; राणादाच्या भावाची नवी मालिका
'जिवाची होतिया काहिली' ही मालिका येत्या 18 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 29, 2022 | 4:28 PM
Share

सोनी मराठी वाहिनीवर भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. येत्या 18 जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ (Jivachi Hotiya Kahili) या मालिकेत मराठी तरुण आणि कानडी तरुणी यांच्या प्रेमाची कहाणी दिसणार आहे. यात प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. मालिकेत राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.

या मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते, हे त्यातून दिसलं. कानडी आणि मराठीचा झकास तडका त्यात बघायला मिळाला. मुख्य कलाकरांबरोबरच आकर्षण ठरले आहेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. विद्याधर जोशी आणि अतुल काळे हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना अवाक् करते आहे.

पहा प्रोमो-

‘जिवाची होतिया काहिली’ ही मालिका येत्या 18 जुलैपासून सोमवार ते शनि संध्याकाळी साडेसात वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलंय. त्याने साकारलेल्या भूमिकासुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. तर दुसरीकडे प्रतीक्षा ही कॉमेडियन, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. प्रतीक्षाने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये प्रशांत दामलेंसोबत काम केलंय. ती गडचिरोली इथली असून नृत्य आणि अभिनयात तिला विशेष रस आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना