Khoya Khoya Chand : चित्रपट आणि मालिका विश्वातून गायब झालाय अभिनेता हर्ष छाया, इंडस्ट्रीच्या ‘या’ गोष्टीमुळे नाराज!

बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांचा प्रसिद्ध अभिनेता हर्ष छाया (Harsh Chhaya) आजकाल अभिनय विश्वातून पूर्णपणे गायब झाला आहे. हर्षने 1990मध्ये झी टीव्हीच्या 'तारा' मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात प्रवेश केला होता. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त हर्षने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दमदार काम केले आहे.

Khoya Khoya Chand : चित्रपट आणि मालिका विश्वातून गायब झालाय अभिनेता हर्ष छाया, इंडस्ट्रीच्या ‘या’ गोष्टीमुळे नाराज!
Harsh Chhaya

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांचा प्रसिद्ध अभिनेता हर्ष छाया (Harsh Chhaya) आजकाल अभिनय विश्वातून पूर्णपणे गायब झाला आहे. हर्षने 1990मध्ये झी टीव्हीच्या ‘तारा’ मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात प्रवेश केला होता. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त हर्षने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दमदार काम केले आहे. हर्ष छायाची मालिका ‘हसरतें’ टीव्हीवर प्रचंड गाजली. अभिनेत्याने 2000मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हर्ष छाया 1993मध्ये ‘आरोहन’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेत तो लेफ्टनंट शर्माच्या भूमिकेत दिसला होता. हर्ष छायाला ‘स्वाभिमान’ या मालिकेत सर्वात मोठा ब्रेक मिळाला. ही मालिका प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बनवली होती. याचबरोबर हर्ष अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसला होता. ज्यात त्याला चांगली पसंतीही मिळाली होती. हिंदी चित्रपटांबरोबरच प्रेक्षकांनी त्याला अनेक मोठ्या गुजराती चित्रपटांमध्येही अभिनय करताना पाहिले आहे. हर्षने आजपर्यंत 30हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हर्ष छायाचे वैयक्तिक आयुष्य

हर्षने 1997 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाहशी लग्न केले, परंतु 2001 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी 2003मध्ये सुनिता सेनगुप्ताशी लग्न केले. अभिनेता मुळचा गुजरातमधला असला तरी, त्याने आपले शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. हर्षने जामिया मिलिया इस्लामियामधून शिक्षण घेतले आहे.

अभिनेता व्यतिरिक्त दिग्दर्शक देखील!

हर्ष छाया याने 2018 मध्ये त्याचा ‘खजूर पे अटके’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात मनोज पाहवा, विनय पाठक, सीमा पहवा यांच्यासह अनेक स्टार्स झळकले होते. हर्षने हा चित्रपटही लिहिला देखील होता.

रंगभूमीवरही केले काम

हर्ष छाया सुरुवातीपासूनच खूप गंभीर व्यक्तिमत्त्व असणारा अभिनेता आहे. हर्ष जेव्हा मुंबईत आला, तेव्हा तो मनोज बाजपेयीसोबत राहत असे. दोघांनी एकत्र कधीच जास्त काम केले नाही, पण दोघांची सुरुवातीपासूनच चांगली मैत्री आहे. हर्ष छायाने अनेक मोठ्या जाहिरातींनाही आपला आवाज दिला आहे. रजनीगंधाच्या जाहिरातीत आपण त्यांचा आवाज ऐकतो. हर्ष इंडस्ट्रीच्या एका गोष्टी तक्रार आहे की, त्याच्यासारखे अनेक गंभीर कलाकार एकाच प्रतिमेला बांधलेले आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक वेळा एकाच प्रकारच्या भूमिकेची ऑफर मिळत राहते. आगामी काळात अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत, असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात गुंड शिरणार, अविनाशला मारहाण करणार! अरुंधतीवर पुन्हा नवीन संकट कोसळणार?

कर्करोगावर यशस्वी मात, वेदना होत असतानाही ‘शो मस्ट गो ऑन’, ‘बिग बॉस मराठी 3’ धुरा सांभाळण्यास महेश मांजरेकर सज्ज!

KBC 13 | ‘केबीसी 13’च्या मंचावर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा बनला पोलीस, अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवला हरयाणवी भाषेत!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI