AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khoya Khoya Chand : ‘दिया और बाती हम’ मालिकेतून अनस रशीदला मिळाली खास ओळख, आता इंडस्ट्रीपासून लांब राहून करतोय ‘हे’ काम

टीव्ही अभिनेता अनस रशीदनं 'दिया औंर बाती हम' मालिकेद्वारे घराघरात नाव कमावलं. मात्र आता तो इंडस्ट्रीपासून लांब आहे. (Khoya Khoya Chand: Anas Rashid got special recognition from 'Diya Aur Bati Hum' serial, now he is working away from the industry)

Khoya Khoya Chand : 'दिया और बाती हम' मालिकेतून अनस रशीदला मिळाली खास ओळख, आता इंडस्ट्रीपासून लांब राहून करतोय 'हे' काम
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 24, 2021 | 8:23 AM
Share

मुंबई : सुपरस्टार बनण्याचे स्वप्न घेऊन हजारो लोक मुंबईत येतात. अनेकांचं हे स्वप्न खूप लवकर पूर्ण होतं, तर काहींना दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर यश मिळतं. आज आम्ही तुम्हाला आमच्या खास सेगमेंट ‘खोया खोया चाँद‘ (Khoya Khoya Chand) मध्ये टीव्ही अभिनेता अनस रशीद (Anas Rashid) बद्दल सांगणार आहोत. ज्यानं ‘दिया औंर बाती हम’ मालिकेद्वारे घराघरात नाव कमावलं. मात्र आता त्यानं इंडस्ट्री अलविदा म्हटलं आहे.

अनस नेहमीच त्याच्या निरागसतेसाठी ओळखला जातो. त्यानं 2004 मध्ये मिस्टर पंजाब हा अवॉर्ड जिंकून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मिस्टर पंजाब हा अवॉर्ड जिंकल्यानंतर त्यानं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला.

‘कहीं तो होगा’च्या माध्यमातून पदार्पण

मिस्टर पंजाब जिंकल्यानंतर अनसनं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2007 मध्ये कहीं तो होगा या मालिकेद्वारे केली. या शोमध्ये त्यानं कार्तिक अहलुवालियाची भूमिका साकारली होती. यानंतर त्यानं क्या होगा निम्मो का, ऐसे करो ना वादा, पृथ्वीराज या सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. अनसनं ‘दिया औंर बाती हम’ या मालिकेतही काम केलं. या मालिकेत अनसनं सूरज राठीची भूमिका साकारली होती. या शोमुळे त्याला घराघरात स्वत:ची वेगळी ओळख मिळाली.

14 वर्षांनी लहान असलेल्या हिनाशी केलं लग्न

अनसनं 2017 मध्ये त्याच्यापेक्षा 14 वर्ष लहान हिना इकबालशी लग्न केलं. दोघांनी लुधियानामध्ये लग्न केलं होतं. अनसनं हिनाला लग्नाबद्दल विचारलं असता तिनं सांगितले की वयामुळे तिला काही फरक पडत नाही.

इंडस्ट्रीपासून लांब राहून करतोय शेती

टीव्ही इंडस्ट्रीला निरोप देऊन अनस आपल्या गावी मालेरकोटला गेला आहे. त्याला इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन 5 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की आता तो शेतकरी झाला आहे आणि त्याला शेतीत आनंद मिळतोय.

संबंधित बातम्या

रामू जेव्हा जॅकीच्या भूमिकेत शिरतो तेव्हा ‘रंगिला’ बनतो, खासगी व्हिडीओ वेगानं व्हायरल

Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली ‘अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील’

Tiger 3 : ‘टायगर 3’च्या सेटवरून सलमान खानचा फर्स्ट लूक लीक, लांब केस आणि दाढीमध्ये भाईजानला ओळखणं कठीण

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली