VIDEO | ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर ‘शकू’साठी पत्र, शुभांगी गोखलेंसह सगळ्यांच्या डोळ्याला धार

मालिकेच्या सेटवर केक आणि एक भावनिक पत्र आले आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळले. (Actress Shubhangi Gokhale Cries )

VIDEO | 'येऊ कशी तशी...'च्या सेटवर 'शकू'साठी पत्र, शुभांगी गोखलेंसह सगळ्यांच्या डोळ्याला धार
Actress Shubhangi Gokhale
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:58 AM

मुंबई : मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने अनेक कलाकार आणि तंत्रज्ज्ञ एकत्र येतात. ऑन स्क्रीन एकत्र कुटुंबातील सदस्यांची भूमिका साकारताना ऑफ स्क्रीनही त्यांच्यात अनोखे बंध जुळतात. असंच काहीसं बाँडिंग झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला‘ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळत आहे. श्रीमंताघरची सून साकारणाऱ्या शकुंतला खानविलकर अर्थात शकू म्हणजेच ओमच्या आईसाठी ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर एक पत्र आलं. हे पत्र इतकं गोड होतं, की फक्त अभिनेत्री शुभांगी गोखलेच (Shubhangi Gokhale) नाही, तर त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. (Marathi TV Actress Shubhangi Gokhale Cries on Set of Yeu Kashi Tashi Mi Nandayla after letter by Daughter Actress Sakhee Gokhale on Mothers Day)

मदर्स डे निमित्त पत्र

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला राज्याबाहेर जावे लागत आहे. झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटिंग सध्या सिल्वासा येथे करण्यात येत आहे. रविवारीच आंतरराष्ट्रीय मदर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. मालिकेची सर्व टीम बायो बबलचं पालन करत असल्यामुळे कोणालाच आपल्या मुलांसोबत किंवा आईसोबत प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाही. अशातच सेटवर केक आणि एक भावनिक पत्र आले आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळले.

सखी गोखलेकडून प्रेमळ भेट

अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आणि अभिनेत्री सखी गोखले (Sakhee Gokhale) हिने मदर्स डे (International Mother’s Day) निमित्त केकसोबत एक पत्रही पाठवले. . “अम्मा (शुभांगी गोखले), अदिती (सारंगधर), दीप्ती (केतकर), शुभांगी (भुजबळ) आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद” असे सखीने पत्रात लिहिले आहे.

शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर

हे पत्र वाचून शुभांगी गोखले तर भावनावश झाल्याच, पण आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं, असं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत स्वीटूच्या भूमिकेत अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar), तर ओमच्या भूमिकेत शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawdekar) हे कलाकार आहेत. याशिवाय शुभांगी गोखले, अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar), दीप्ती केतकर (Deepti Ketkar), शुभांगी भुजबळ (Shubhangi Bhujbal), निखिल राऊत (Nikhil Raut), उदय साळवी, मिलिंद जोशी यासारखे कलाकार आहेत. (Actress Shubhangi Gokhale Cries )

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच

अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये नवा ट्विस्ट

(Marathi TV Actress Shubhangi Gokhale Cries on Set of Yeu Kashi Tashi Mi Nandayla after letter by Daughter Actress Sakhee Gokhale on Mothers Day)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.