Video | निक्की तांबोळीच्या शॉर्ट टॉपने कॅमेरासमोरच केला घोटाळा, व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायत…

अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ रोजच चर्चेत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात निक्की तांबोळी पुन्हा एकदा स्पॉट झाली आणि यावेळी ती अशा विचित्र पोशाखात दिसली की, त्याचा तिलाच त्रास होऊ लागला.

Video | निक्की तांबोळीच्या शॉर्ट टॉपने कॅमेरासमोरच केला घोटाळा, व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायत...
Nikki Tamboli

मुंबई : अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ रोजच चर्चेत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात निक्की तांबोळी पुन्हा एकदा स्पॉट झाली आणि यावेळी ती अशा विचित्र पोशाखात दिसली की, त्याचा तिलाच त्रास होऊ लागला.

प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड स्टाईलमुळे, तर कधी तिच्या हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे निक्की अनेकदा चर्चेत असते. आता नुकताच निक्कीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती अशा पोशाखात दिसत आहे की, लोक तिची खिल्ली उडवत आहेत.

निक्कीचा बोल्ड अवतार!

निक्कीचा हा व्हिडीओ ‘बिग बॉस’ फेम आणि आरजे शार्दुल पंडित याच्या वाढदिवसाच्या पार्टी दरम्यानचा आहे, जिथे निक्की तांबोळी खूपच बोल्ड अवतारात आली होती. मात्र, या पार्टीसाठी निक्कीने निवडलेले कपडे तिच्या चाहत्यांना अजिबात आवडले नसल्याने, सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडियावरही होतेय ट्रोल!

व्हिडीओमध्ये निक्की काळ्या रंगाच्या शॉर्ट टॉप आणि रिप्ड ब्लॅक जीन्समध्ये दिसत आहे. या पोशाखात अभिनेत्री खूप हॉट दिसतेय. परंतु, तिचा टॉप खूपच लहान आहे आणि जीन्स देखील खूपच फाटलेली आहे. स्वतःच टॉप सांभाळण्यासाठी निक्की सतत तो खेचत आहे. या टॉपमध्ये अभिनेत्री स्वतःच कम्फर्टेबल असल्यासारखी वाटत नाहीये. या व्हिडीओवर कमेंट करून लोक निक्की तांबोळीची खिल्ली उडवत आहेत. काही तिच्या कपड्यांवर तर, काही तिच्या फोटो पोझवर कमेंट करत आहेत. तर, काही तिला ‘दुसरी उर्फी जावेद’ म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कोण आहे निक्की तांबोळी?

निक्की तांबोळी ही साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे, पण ‘बिग बॉस 14’ नंतर तिची ओळख आणि प्रसिद्ध खूप वाढली आहे. निक्की ‘बिग बॉस 14’ जिंकू शकली नसली, तरी तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. या शोनंतर निक्की ‘खतरों के खिलाडी’मध्येही दिसली होती.

हेही वाचा :

Happy Birthday Udit Narayan | नेपाळ इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात, आमिर खानच्या एका गाण्याने बदललं उदित नारायण यांचं आयुष्य!

Nikita Dutta | कबीर सिंग फेम निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला, अभिनेत्रीने शेअर केला शॉकिंग एक्सपिरिअन्स

Happy Birthday Saurabh Raj Jain | भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेने मिळवून दिली ओळख, हॉलिवूड चित्रपटातही झळकलाय सौरभ जैन!


Published On - 10:40 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI