तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणात लव्ह जिहादचा मुद्दा, यावर पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

इतकेच नाहीतर तुनिशा हिने देखील शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये आत्महत्या केलीये.

तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणात लव्ह जिहादचा मुद्दा, यावर पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 6:29 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महेत्येनंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली. खरोखरच तुनिशा शर्मा हिचा बळी लव्ह जिहादमुळेच गेला का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रकरणात दास्तान-ए-काबुल या मालिकेमधील तुनिशाचा सहकलाकार शीजान खान यांच्यावर तुनिशाच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाहीतर तुनिशा हिने देखील शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये आत्महत्या केलीये.

तुनिशा हिच्या आईने केलेल्या आरोपांनंतर FIR दाखल करत पोलिसांनी शीजान याला अटक केलीये. पोलिसांनी शीजान याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीये.

राम कदम यांनी उपस्थित केलेल्या लव्ह जिहादच्या मुद्दावर एसीपी चंद्रकांत जाधव यांनी मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत जाधव म्हणाले, आतापर्यंत या केसमध्ये लव्ह जिहादचा कोणताच अँगलसमोर आला नाहीये.

शीजान आणि तुनिशा हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. परंतू यांचे ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती. याच तणावामध्ये तिने आत्महत्या केलीये. अजून तपास हा सुरू आहे आणि लवकरच तुनिशाच्या आत्महत्येचे नेमके कारण पुढे येईल.

शीजान याची चाैकशी सुरू आहे. शीजान याला न्यायालयामध्ये हजर करून कोठडी मागितली आहे. 28 तारखेपर्यंत शीजान हा पोलिस कोठडीमध्ये आहे. त्याची संपूर्ण चाैकशी ही करण्यात येणार आहे.

एक अफवा होती की, तुनिशा ही प्रेग्नेंट होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केलीये. परंतू असे काही नाहीये. तुनिशा हिने तिच्या आईला सांगितले होते की, शीजानसोबत तिचे ब्रेकअप झाले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.