AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | व्हिडीओमध्ये प्रियंका चाैधरी नसल्याने चाहत्यांचा संताप, म्हणाले, बिग बाॅस 16 ची खरी विजेता…

थेट प्रियंका चाैधरी हिच्या चाहत्यांनी बिग बाॅसच्या निर्मात्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. बिग बाॅस 16 हे टाॅप मध्ये राहिले. या सीजनमधून प्रेक्षकांचेही जबरदस्त असे मनोरंजन झाले आहे.

Video | व्हिडीओमध्ये प्रियंका चाैधरी नसल्याने चाहत्यांचा संताप, म्हणाले, बिग बाॅस 16 ची खरी विजेता...
| Updated on: Feb 14, 2023 | 2:53 PM
Share

मुंबई : बिग बाॅस 16 ला त्याचा विजेता मिळाला आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर अजूनही काही लोकांना हे पटलेले दिसत नाहीये. कारण सतत सोशल मीडियावर दावा केला जातोय की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता व्हायला हवे होते. एमसी स्टॅन याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. परंतू बिग बाॅसच्या शोमध्ये एमसीने खास गेम खेळला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. प्रियंका चाैधरी ही बिग बाॅस 16 ची विजेती झाली नाही आणि प्रियंका तीन नंबरला घरातून बाहेर पडली हे तिच्या चाहत्यांच्या पचनी पडत नाहीये. कारण अजूनही सोशल मीडियावर प्रियंका चाैधरी हिचे चाहते तिलाच खरी बिग बाॅस 16 ची विजेती मानतात. काहीही विषय नसला तरीही तिचे चाहते हे एमसी स्टॅन याला टार्गेट करताना दिसत आहेत. थेट प्रियंका चाैधरी हिच्या चाहत्यांनी बिग बाॅसच्या निर्मात्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. बिग बाॅस 16 हे टाॅप मध्ये राहिले. या सीजनमधून प्रेक्षकांचेही जबरदस्त असे मनोरंजन झाले आहे.

नुकताच फराह खान हिने तिच्या घरी बिग बाॅस 16 च्या सदस्यांसाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बिग बाॅसच्या घरात सहभागी झालेले सर्वच सदस्य उपस्थित राहिले होते.

शिव ठाकरे, अब्दु रोजिक, साजिद खान, एमसी स्टॅन, निम्रत काैर, टीना दत्ता, अर्चना गाैतम, शालिन भनोट, श्रीजिता डे, सुंबुल ताैकीर, साैंदर्या शर्मा असे सर्वच स्पर्धेक या पार्टीमध्ये धमाल करताना दिसले.

या दरम्यान फराह खान हिने सोशल मीडियावर या पार्टीतील एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये मंडळी मस्ती करताना दिसत आहे. निम्रत काैर, साजिद खान, अब्दु रोजिक, शिव ठाकरे दिसत आहेत.

हा व्हिडीओ पाहून प्रियंका चाैधरी हिच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. व्हिडीओमध्ये प्रियंका चाैधरी दिसत नसल्याने एका चाहत्याने विचारले की, बिग बाॅस 16 ची खरी विजेती कुठे आहे?

व्हिडीओमध्ये प्रियंका चाैधरी दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांना वाटले की, या पार्टीमध्ये प्रियंका चाैधरी हिला डावलण्यात आले होते. मात्र, या पार्टीमधील अजून काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये प्रियंका चाैधरी ही देखील दिसत आहे. परंतू व्हिडीओमध्ये प्रियंका चाैधरी दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांना संपात व्यक्त केलाय. फोटोमध्ये प्रियंका चाैधरी ही अर्चना गाैतम हिच्यासोबत दिसत आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.