AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | आदिल दुर्रानी याने धोका दिल्याने राखी सावंत दु:खात, म्हणाली मला धक्का दे, मी मरून जाते…

राखी सावंत हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आदिल दुर्रानी याने मला लग्नाची गोष्ट पुढचे एक वर्ष कोणालाच सांगायचे नाही, असे सांगून ठेवले होते.

Rakhi Sawant | आदिल दुर्रानी याने धोका दिल्याने राखी सावंत दु:खात, म्हणाली मला धक्का दे, मी मरून जाते...
| Updated on: Jan 15, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बिग बाॅस मराठीमधून बाहेर आल्यानंतर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राखीने सर्वांनाच मोठा धक्का दिला. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने आदिल दुर्रानी यांच्यासोबत लग्न केले असून यांनी अगोदर कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला. राखी सावंत हिने हे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले. परंतू आदिल दुर्रानी याने धक्कादायक विधान करत म्हटले की, हे लग्न मी नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही. कारण मी खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये हे लग्न केले आहे. मला फक्त दहा दिवसांचा वेळ द्या मी सर्वकाही स्पष्ट करेल. आदिल दुर्रानी (Adil Durrani याने राखी सावंत हिच्यासोबतच्या लग्नाला थेट नकारच दिलाय.

राखी सावंत हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आदिल दुर्रानी याने मला लग्नाची गोष्ट पुढचे एक वर्ष कोणालाच सांगायचे नाही, असे सांगून ठेवले होते. परंतू मी लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने आदिल दुर्रानी माझ्यावर नाराज आहे.

मी बिग बाॅस मराठीमध्ये दाखल होण्याच्या अगोदर सर्वकाही ठिक होते. परंतू मी बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर काही गोष्टीमध्ये मला बदल दिसले. यामुळेच मी लग्नाचे गुपित उघड केले, असे राखी सावंत म्हणाली होती.

आता राखी सावंत हिचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत हिच्यासोबत मोनालिसा ही दिसत आहे. मोनालिसा आणि राखी चांगल्या मैत्रिणी आहेत. मोनालिसा अगोदर राखीला लग्न झाल्याबद्दल शुभेच्छा देते.

यावर राखी म्हणते, माझे लग्न झाले आहे. परंतू माझा नवरा पळून गेलाय. कोर्टात लग्न केले मग निकाह झाला. मी इस्लाम कबुल केला, इतकेच नाहीतर नाव देखील बदलले. परंतू आता माझा नवरा लग्नास नकार देत असल्याचे राखी मोनालिसा हिला सांगते.

यावर मोनालिसा म्हणते की, खरोखरच मला हे माहिती नव्हते. पुढे राखी मोनालिसा हिला म्हणते, एक काम कर समोरून ट्रक येतोय…मला धक्का मार…मी मरून जाते…माझे नशीब बघत आहेस का? असेही राखी मोनालिसा हिला म्हणते.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.