अटक टाळण्यासाठी राखी सावंत हिची मुंबई उच्च न्यायालयात धाव, शर्लिन चोप्रा प्रकरण भोवणार?

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 6:32 PM

शर्लिन चोप्रा हिच्या प्रकरणात राखी सावंत हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी याचप्रकरणात राखीला चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते.

अटक टाळण्यासाठी राखी सावंत हिची मुंबई उच्च न्यायालयात धाव, शर्लिन चोप्रा प्रकरण भोवणार?

मुंबई : राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सात महिन्यांपूर्वी आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. राखीने बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर आदिल याच्यासोबतच्या लग्नाची काही फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. इतकेच नाहीतर लग्नानंतर आपले नाव बदलल्याचे देखील राखी सावंत हिने सांगितले. आता लग्नानंतर राखी सावंत हिचे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे असून तिने इस्लाम देखील स्वीकारला आहे. मात्र, आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न स्वीकारू शकत नाही आणि नाकारू देखील शकत नसल्याचे म्हणत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मात्र, आता आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न मान्य केले आहे.

शर्लिन चोप्रा हिच्या प्रकरणात राखी सावंत हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी याचप्रकरणात राखीला चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते. राखीने चाैकशीमध्ये सहकार्य केल्याचे देखील पोलिसांनी सांगितले होते.

आता शर्लिन चोप्रा प्रकरणात राखी सावंत हिने मोठे पाऊल उचलत थेट अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून राखी सावंत हिला काही दिलासा मिळतो का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

राखी सावंत हिच्यावर शर्लिन चोप्रा हिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. शर्लिन चोप्रा हिच्या तक्रारीनंतर राखी सावंत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता याच प्रकरणात राखी सावंत हिच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात अटक होऊ शकते. यामुळेच राखी सावंत हिने न्यायालयामध्ये धाव घेतलीये.

बिग बाॅस १६ मध्ये साजिद खान हा दाखल झाल्यानंतर शर्लिन चोप्रा हिने गंभीर आरोप करत साजिद खान याला बिग बाॅसच्या घराबाहेर काढण्याची मागणी केली होती. याच प्रकरणात राखी सावंत हिने उडी घेतली होती.

साजिद खान आता बिग बाॅसच्या घराबाहेर आलाय. मात्र, आता राखी सावंत हिच्या अडचणींमध्ये वाढ झालीये. साजिद खान हा माझा भाऊ असून तो असे काहीच करू शकत नसल्याचे म्हणत राखी सावंत हिने शर्लिन चोप्रा विरोधात मोर्चा सुरू केला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI