मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचे बालपणीचे मित्रं आणि मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनाही हा धक्का अनपेक्षित होता. सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर कीर्तीकुमार यांनी त्याच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थ आमच्यासाठी कायम मॉन्टीच होता. आम्ही त्याल मॉन्टी किंवा मोन्टू म्हणायचो. तो प्रकाशझोतात आल्यानंतर त्याचं नाव सिद्धार्थ असल्याचं समजलं. तोपर्यंत तो आमच्यासाठी मॉन्टीच होता, असं कीर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. (Sidharth Shukla: kirti kumar shinde Remember childhood friend, Says ‘he was our monty’)