Sidharth Shukla Funeral Highlights : सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन, सेलिब्रिटी-चाहत्यांनी घेतला अंतिम निरोप

सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे. शोकाकुल चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली आहे. दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Sidharth Shukla Funeral Highlights : सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन, सेलिब्रिटी-चाहत्यांनी घेतला अंतिम निरोप
Sidharth Shukla

मुंबई : ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला होता.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 03 Sep 2021 15:52 PM (IST)

  सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन, सेलिब्रिटी-चाहत्यांनी घेतला अंतिम निरोप

  मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. यावेळी अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले होते, सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला आली होती.

 • 03 Sep 2021 13:55 PM (IST)

  अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला

  सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचले आहे. थोड्याच वेळात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले असून सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला आली आहे

 • 03 Sep 2021 13:39 PM (IST)

  सिद्धार्थचे पार्थिव मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत दाखल, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

  1. सिद्धार्थचे पार्थिव मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत दाखल, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार


 • 03 Sep 2021 13:21 PM (IST)

  मित्र आणि कुटुंबातील सदस्य ओशिवरा स्मशानभूमीत दाखल

  अली गोनी, असीम रियाज, ब्रह्मा कुमारी समाजाचे सदस्यही स्मशानभूमीत पोहोचले आहेत. आता कुटुंबातील सदस्यांची आणि सिद्धार्थच्या पार्थिवाची वाट पाहत आहे.

 • 03 Sep 2021 13:20 PM (IST)

  राखी सावंत सिद्धार्थच्या घरी पोहोचली

 • 03 Sep 2021 13:19 PM (IST)

  सिद्धार्थचा मृतदेह कूपर रुग्णालयातून रुग्णवाहिकेत

  फुलांनी सजलेली रुग्णवाहिका कूपर हॉस्पिटलच्या आत गेली आहे. सेलिब्रिटी घरी सिद्धार्थच्या पार्थिवाची वाट पाहत आहेत.

 • 03 Sep 2021 11:04 AM (IST)

  Sidharth Shukla Death | झोपण्यापूर्वी औषधांचं सेवन

  सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं सेवन केली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाचा नाही. डॉक्टरांनी अहवालात हार्ट अटॅकमुळे त्याच्या मृत्यूची पुष्टी केली असताना, आणखी एक गोष्ट समोर आली आहे. या माहितीनुसार, काल रात्री सिद्धार्थ शुक्ला ज्या गाडीने फ्लॅटवर पोहोचला, त्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटलेली होती.

 • 03 Sep 2021 11:03 AM (IST)

  Sidharth Shukla Funeral | सिद्धार्थच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार

  सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

 • 03 Sep 2021 11:01 AM (IST)

  Sidharth Shukla PM Report | सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?

  सिद्धार्थ शुक्लाच्या शव विच्छेदनानंतर डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. व्हिसेरा संरक्षित करण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण हिस्टोपॅथोलॉजिकल अहवालानंतरच उघड होईल. शरीरावर कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत जखमा नाहीत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI