Siddharth Shukla Death : शहनाजला करायचं होतं सिद्धार्थ शुक्लाशी लग्न, बिग बॉस 13च्या ‘या’ माजी स्पर्धकानं केला खुलासा

अबू मलिक म्हणाले- मला वाटतं पहिल्या लॉकडाऊनच्या फक्त एक दिवस आधी, बहुधा 22 मार्च 2020 रोजी शहनाजनं मला मध्यस्थाची भूमिका घ्यायला सांगितलं आणि सिद्धार्थला सांगायला लावलं की त्यानं शहनाजशी लग्न करावं. सिद्धार्थ शहनाजवर खूप प्रेम करायचा. (Siddharth Shukla Death: Shahnaz wanted to marry Siddharth Shukla, former 'Bigg Boss 13' contestant revealed)

Siddharth Shukla Death : शहनाजला करायचं होतं सिद्धार्थ शुक्लाशी लग्न, बिग बॉस 13च्या 'या' माजी स्पर्धकानं केला खुलासा

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाचे (Siddharth Shukla Death) कुटुंब आणि जवळचे लोक अजूनही विश्वास ठेवू शकत नाहीत की सिद्धार्थ आता या जगात नाही. सिद्धार्थच्या जवळच्या मित्रांमध्ये अबू मलिक यांचाही समावेश आहे, जे सिद्धार्थसोबत ‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोचा भाग होते. दोघंही खूप चांगले मित्र होते. ईटाइम्सच्या अहवालानुसार, अबू मलिक यांनी खुलासा केला आहे की, शहनाज गिलला सिद्धार्थ शुक्लाशी लग्न करायचं होतं.

अबू मलिक यांनी सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांच्यातील संबंधांबद्दलही सांगितलं. दोघं अनेकदा अबू मलिक यांच्या घरातून एकत्र येताना दिसले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज गिलची स्थिती कशी असेल याबद्दल अबू मलिक खूप चिंतेत आहेत. रिपोर्टनुसार, अबू मलिक यांना ते जुने दिवस आठवले जेव्हा शहनाज गिलनं सिद्धार्थशी तिच्या मनातल्या गोष्टी अबूला सांगितल्या होत्या.

शहनाज रागावली तर सिद्धार्थचा दिवस खराब व्हायचा

अबू मलिक म्हणाले- मला वाटतं पहिल्या लॉकडाऊनच्या फक्त एक दिवस आधी, बहुधा 22 मार्च 2020 रोजी शहनाजनं मला मध्यस्थाची भूमिका घ्यायला सांगितलं आणि सिद्धार्थला सांगायला लावलं की त्यानं शहनाजशी लग्न करावं. सिद्धार्थ शहनाजवर खूप प्रेम करायचा. तो म्हणायचा की जर एक दिवस तिला राग आला तर त्याचा दिवस वाईट होतो.

सिद्धार्थबद्दल बोलताना अबू मलिक म्हणाले- “मी आणि सिद्धार्थ एकमेकांच्या खूप जवळ होतो. जेव्हा मी त्याला सांगितलं की मी गेममध्ये जास्त काळ राहू शकणार नाही, तेव्हा सिद्धार्थनं मला बिग बॉस 13 च्या घरात राहावं असं सांगितलं. तो रागावला आणि म्हणाला की मी प्रयत्न करायला पाहिजे.”

त्याच्या आणि सिद्धार्थच्या मैत्रीबद्दल बोलताना ते म्हणाले की बिग बॉस 13 नंतरही आम्ही संपर्कात होतो. सिद्धार्थनं माझ्याशी बोलण्यात आणि गाणी ऐकण्यात बराच वेळ घालवला आहे. दोन -तीन दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं. आम्ही जवळजवळ दररोज बोलायचो. मी त्याला फोन करायचो आणि तो फोन उचलायचा. महिनाभरापूर्वी त्यानं माझे कॉल उचलणे बंद केले. कदाचित तो कुठेतरी व्यस्त असेल, पण नंतर त्यानं मला तीन दिवसांपूर्वी फोन केला.

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

संबंधित बातम्या

Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल दुःखात, वडिलांनी सांगितली कशी आहे मुलीची परिस्थिती

Sidharth Shukla dies : ‘SidNaaz’ची जोडी तुटली, सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल

Sidharth Shukla Passes Away | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, सोशल मीडिया शोकाकुल, चाहते म्हणाले विश्वास बसत नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI