AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

हेमांगीच्या या बेधडक पोस्ट नंतर नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. या दरम्यान अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मात्र, याच वेळी काही लोक हेमांगीला बोल देखील लावत आहेत. तरीही बहुतांश नेटकऱ्यांनी तिचे कौतुकाच केले आहे.

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!
हेमांगी कवी
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 13, 2021 | 11:56 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरुन अनेक बोल्ड मानल्या जाणाऱ्या विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त करत असताना दिसत असते. यावेळी हेमांगीने “बाई, बुब्स आणि ब्रा” या चार चौघात चर्चेसाठी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य केलं आहे. “ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?” असा मनमोकळा सवालही हेमांगीने विचारला आहे.

हेमांगीच्या या बेधडक पोस्ट नंतर नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. या दरम्यान अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मात्र, याच वेळी काही लोक हेमांगीला बोल देखील लावत आहेत. तरीही बहुतांश नेटकऱ्यांनी तिचे कौतुकच केले आहे.

वाचा काय म्हणतात नेटकरी…

‘एकच नंबर लेख लिहीलाय हेमांगी मॅडम, वस्तुस्थिती मांडली आहे आपण आजची. फार कमी लोकांन मध्ये असते अशी हिम्मत स्पष्ट बोलण्याची. मी कधी आपल्या सीरिअल्स किवा चित्रपट नाही पाहिले पण आपले विचार पाहून मी आपला पक्का पंखा झालो हे मात्र नक्की.’ असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर, आणखी एक चाहती म्हणते, ‘मी आवर्जुन तो उल्लेख केलेला व्हिडिओ पुन्हा पाहिला बट स्टिल्ल मला त्यात खटकण्यासारखे काही मिळाले नाही.लक्ष पोळी वर होते.या अनुषंगाने मला तो myntra लोगो वाला किस्सा आठवतोय, अश्लीलता सर्वप्रथम पाहणाऱ्याच्या डोक्यात असते,मग ती डोळ्यांना दिसते. असो. बाकी अश्या लोकांना ही शाल जोडीतली चपराक ठरो!!! तुला खूप खूप प्रेम व आदर पूर्वक पाठींबा’.

‘लेखाची दिशा अशी आहे की, काही दिवसांनी मुलींनी कपडे का घालायचे ही चळवळ येइल आणि कपडे न घालता फिरतील बायका जगात बहुतेक! बोल्ड विषय नक्की पण आवश्यक नाही वाटत,’ अशा आशयाचीही एक कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

‘बाई, बुब्स आणि ब्रा’ वाचा हेमांगीची पोस्ट जशीच्या तशी…

‘बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो! मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही! हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice! पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…

ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!

आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!

Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!

ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?

किती तरी मुली ब्रा घालून ही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात… 2 2 ब्रा घालतात, nipple area ला tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकट पट्टी लावतात… बाप रे!…कशासाठी एवढं आणि का?

किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही ‘लोग क्या कहेंगे’ या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच ‘लोग क्या कहेंगे’ लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!

स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी ‘काढण्याची मुभा’ दिल्या सारखी काढून ठेवायची! त्यावेळी ही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार!

बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं? का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो prob त्या पुरुषांचा आहे!

आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घालत! माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही without ब्रा वावरतो! आम्हांला असं पाहून ना त्यांचे कधी विचार बदलले ना नजर! ना माझ्या आई मार्फत आम्हांला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं ‘त्यांच्या’ डोक्यात पक्कं आहे! आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही! बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो!

याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींशी काही संबंध नाही! अरे किती ती बंधनं? किती ते ‘लोक काय म्हणतील’ चं ओझं व्हायचं? अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या! खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छे ने Without ब्रा वावरणे , दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी!

(Social Media Users and Fans praising hemangi kavi after her post about bra)

हेही वाचा :

Nilu Phule Death Anniversary | एक असा खलनायक, जो एकही डॉयलॉग न बोलता, भय निर्माण करायचा

Lookalike | शर्मिला टागोर यांची डुप्लिकेट दिसते राहुल महाजनची पूर्वपत्नी, पाहा फोटो

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?