Tere Ishk Mein OTT Release: 2 तास 47 मिनिटांचा चित्रपट, लव्हस्टोरी पाहून डोळ्यांतून येईल पाणी; ओटीटी रिलीजची तारीख समोर
धनुष आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'तेरे इश्क में' हा चित्रपट नोव्हेंबर 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर ओटीटीवर आता तो पाहू शकता. कधी आणि कुठे ते जाणून घ्या..

आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रांझना’ या चित्रपटाने 2013 मध्ये थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. साऊथ सुपरस्टार धनुष आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या हटके कथेनं आणि त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली होती. याच चित्रपटाचा दुसरा भाग म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘तेरे इश्क में’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्येही धनुषचीच मुख्य भूमिका आहे, परंतु अभिनेत्रीची जागा क्रिती सनॉनने घेतली. जर थिएटरमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकला नसाल, तर आता ओटीटीवर तो स्ट्रीम होतोय. हिमांशू शर्मा आणि नीरज यादव यांनी लिहिलेला ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट ‘रांझना’चा सीक्वेल आहे.
‘तेरे इश्क में’ या चित्रपटाची कथा शंकरभोवती फिरते, जो मुक्तीच्या प्रेमात पडतो. नंतर तो भारतीय हवाई दलात रुजू होतो आणि तिथे त्याचा भूतकाळ त्याला पुन्हा त्रास देऊ लागतो. यापुढची कथा तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळू शकेल. हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रदर्शनाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर 23 जानेवारी 2026 रोजी धनुष आणि क्रितीचा हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सचं सदस्यत्व घ्यावं लागेल.
View this post on Instagram
‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 95 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 148 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. या चित्रपटातील धनुष आणि क्रितीच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. एकतर्फी प्रेमाची कहाणी दर्शविणारी ही एक भावनिक प्रेमकथा होती. थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासोबतच गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या (IFFI) गाला प्रीमियर विभागातही हा चित्रपट प्रदर्शित झाला.
‘तनू वेड्स मनू’, ‘रांझना’ या चित्रपटांनंतर ‘तेरे इश्क में’मध्ये उत्कट प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. नायक आणि नायिकेतील संघर्ष, प्रेमातील वेडेपणा, हृदयभंग, प्रेमासाठी कोणतीही सीमा ओलांडणं, वडील आणि भावासोबतचं भावनिक नातं.. हे सर्व घटक प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. धनुष, क्रिती सनॉन, प्रकाश राज, मोहम्मद झीशान अयुबदिल, प्रियांशु पेनुली या कलाकारांनी चित्रपटात दमदार काम केलंय.
