चेन्नई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका जोडीच्या विभक्त होण्याची माहिती समोर येत आहे. साऊथ सुपरस्टार थलपती विजय हा लग्नाच्या 23 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विजय आणि त्याची पत्नी संगीता यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव जेसन तर मुलीचं नाव दिव्य आहे. घटस्फोटाच्या या चर्चांवर दोघांनी अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. थलपती विजय सध्या त्याच्या आगामी ‘वारिसू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही काळापासून तो पत्नीपासून वेगळं राहत असल्याचंही म्हटलं जात आहे.