AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलीवूड साऊथ स्टारना इज्जत देत नाही,मागते भिक.. थलपती विजय याची को-स्टार भडकली

साऊथची टॉप अभिनेत्री सिमरन हीने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिने बॉलीवूडचे स्टार्स साऊथच्या कलाकारांसोबत नीट वागत नसल्याचे तिने म्हटले आहे. आणखी धक्कादायक आरोप तिने केले आहेत.

बॉलीवूड साऊथ स्टारना इज्जत देत नाही,मागते भिक.. थलपती विजय याची को-स्टार भडकली
South Indian Actress Sirman
| Updated on: May 07, 2026 | 9:58 PM
Share

बॉलीवूड इंडस्ट्री आणि साऊथ इंडियन इंडस्ट्रीची तुलना नेहमीच होत असते. साऊथच्या अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर टीका केलेली आहे. एकदा तर साऊथ सुपरस्टार महेश बाबू याने एका प्रेस कॉन्फरन्समघ्ये म्हटले होते की ते बॉलीवूडमध्ये काम यासाठी करत नाही त्यांची फि बॉलीवूडला परवडणार नाही ! आता साऊथच्या आणखी एका स्टारने बॉलीवूड इंडस्ट्रीची पोल खोलली आहे.

सलमान खान याचा चित्रपट टायगर 3 आणि मनोज वाजपेयी याचा चित्रपट गुलमोहर यात दिसलेली तामिळ अभिनेत्र सिमरन हीने जिचे खरे नाव ऋषिबाला आहे. तिने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की बॉलीवूडमध्ये त्याची कोणी मान ठेवत नाही. अनेक काळ काम करुनही त्यांना तो सन्मान दिला आहे ज्याच्या त्या हक्कदार आहेत. त्यामुळे याचा खूप त्रास होतो असे सिमरन हीने म्हटले आहे.

बॉलीवुडच्या वागणूकीने नाराज सिमरन

सिमरन पुढे म्हणाली की हिंदीत मी काम करण्यास मना केले आहे कारण तेथील लोकांशी जवळीक वाटत नाही. असे वाटते त्यांनी आमचे साऊथचे काम पाहिलेच नाही. आणि जी लेगेसी जे आमचे पूर्वीचे अभिनेते घेऊन आले आहेत, त्याचाही त्यांना पत्ता नाही. ही बाब मला त्रास देते. तेथे सन्मान मिळत नाही. मी माझे अर्ध्याहून अधिक जीवन सिनेमाला दिले आहे. तरीही जर मला सन्मान मिळत नसेल तर खूप दु:ख होते. हे अजिबात योग्य नाही.

सिमरन म्हणाली की ते आमच्या हॉटेल मुक्कामावरही भिक मागतात. ते माझ्या सोबतच्या लोकांची संख्या मर्यादित करतात. ते म्हणतात इतका जास्त स्टाफ ठेवू नका. ते हॉटेल आणि तिकीटावरही घासाघीस करतात. हे सर्व मला त्रास देते. परंतू कोणी याबद्दल बोलत नाही.तेथे इतकी हायरार्की जास्त आहे की काम करण्याचे मन करत नाही.मनाला खूप वाईट वाटते.

सनी देओल केली स्तूती

मात्र, सिमरन हीने सांगितले की इंडस्ट्रीत सर्व प्रोड्यूसर्स तसे नाहीत. तिने सनी देओलच्या अपकमिंग फिल्म गबरुचे उदाहरण दिले, ज्यात ती दिसणार आहे. अभिनेत्री म्हणाली की त्या चित्रपटाचे निर्माते ओम छंगाणी खूप चांगले गृहस्थ आहेत. एवढेच काय सनी देओल देखील चांगले को-स्टार आहेत. सिमरन हीने मनोज वाजपेयी याचा चित्रपट गुलमोहरमध्ये काम करणे हा देखील एक चांगला अनुभव असल्याचे म्हटले आहे.

सिमरन तामिळ चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्री पैकी एक आहे. तिने थलपती विजय याच्या अनेक चित्रपटात काम केले आहे आणि त्याची हिरोईन म्हणूनही काम केलेले आहे. याशिवाय तेलुगु, मल्याळल आणि कन्नड सिनेमातही तिने काम केलेले आहे.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?