AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The kashmir files : ‘द काश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकरांचे भाष्य, काय म्हणाले नाना पाटेकर? का वाढतोय चित्रपटाचा वाद?

'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा वाद थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अशा परिस्थितीत आता सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘द काश्मीर फाईल्स’यावर बोलताना विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 'द काश्मीर फाइल्स' रिलीज झाल्यापासून हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तर दुसरीकडे काश्मीर फाइल्स या विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नसल्याचंही दिसतंय.

The kashmir files : 'द काश्मीर फाइल्स'च्या वादावर नाना पाटेकरांचे भाष्य, काय म्हणाले नाना पाटेकर? का वाढतोय चित्रपटाचा वाद?
'द काश्मीर फाइल्स'च्या वादावर नाना पाटेकरांचे भाष्य.Image Credit source: social
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 8:46 AM
Share

‘द कश्मीर फाइल्स’ (the kashmir files)या चित्रपटाचा वाद थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अशा परिस्थितीत आता सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर (Bollywood Actor Nana Patekar) यांनी ‘द काश्मीर फाईल्स’यावर बोलताना विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. अभिनेते अनुपम खेर (Actor Anupam Kher) आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Actor Mithun Chakraborty)मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज झाल्यापासून हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तर दुसरीकडे काश्मीर फाइल्स या विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नसल्याचंही दिसतंय. अशातच आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’शी बोलताना विनाकारण गोंधळ घालणे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, भारत हा हिंदू आणि मुस्लिम दोघांचा देश आहे आणि समाजात फूट आणि भेदभाव योग्य नाही. एकीकडे या चित्रपटावर दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटत असताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास 80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतरचा पहिला आठवडा हा प्रत्येक चित्रपटासाठी महत्त्वाचा असतो. याच पहिल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ने प्रेक्षक-समीक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही.

नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले?

‘आपला देश हा हिंदू आणि मुस्लिम दोघांचा देश आहे. या दोघांचे एकत्र राहणे आवश्यक आहे. त्यांनी एकत्र राहावे. त्यांच्यात अशी विभागणी होत आहे, हे योग्य नाही. यादरम्यान नाना पाटेकर यांनी हेही स्पष्ट केले की, आपण अद्याप हा चित्रपट पाहिला नसला तरी या प्रकरणी आपण फार काही बोलू इच्छित नाही. चित्रपटांबाबत असे वाद निर्माण करणे योग्य नसल्याचे पाटेकर यावेळी म्हणाले.

चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 1990 च्या घटनेवर आधारित आहे. ज्याने संपूर्ण देश हादरला होता. काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या मुद्द्यावर चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटगृहांमध्ये एक आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यावरून या चित्रपटाला कितपत पसंती मिळत आहे, याचा अंदाज लावता येतो, असंही नाना पाटेकर यावेळी म्हणालेत. तर दुसरीकडे विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून सांगितले आहे की, द काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिस कलेक्शन रिलीजच्या सातव्या दिवशी 18.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यानंतर चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 97.30 रुपये झाले आहे.

इतर बातम्या

Viral होत असलेला Balloon Prankचा ‘हा’ Video पाहिला का? हसून हसून पोट दुखेल

Marathi Movie : ‘आश्रय’ सिनेमाच्या टिमची माहेर संस्थेला भेट, ‘माहेर’वासीयांच्या चेहऱ्यावर फुलवलं हास्य

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.