AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो एकमेव सिनेमा ज्यामध्ये रजनीकांत यांच्या खऱ्या पत्नीने केले होते काम

74 व्या वर्षीही रजनीकांत यांचा उत्साह आणि लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. त्यांची पत्नी लाईमलाईट पासून लांब असली तरी त्यांनी एका सिनेमामध्ये काम केले आहे.

तो एकमेव सिनेमा ज्यामध्ये रजनीकांत यांच्या खऱ्या पत्नीने केले होते काम
Rajinikanth and lathaImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 15, 2025 | 7:26 PM
Share

तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी सिनेमा ‘कुली’ 14 ऑगस्ट 2025 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटानंतर रजनीकांत ‘जेलर 2’ मध्ये झळकणार असून, हा चित्रपट नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. वयाच्या 74व्या वर्षीही रजनीकांत यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि ते आजही ‘मास हिरो’ म्हणून ओळखले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांची पत्नी देखील एका सिनेमामध्ये दिसली होती.

रजनीकांत: तमिल सिनेमाचे बिनधास्त सुपरस्टार

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ रजनीकांत तमिळ चित्रपटसृष्टीचे सम्राट मानले जातात. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात खलनायकाच्या भूमिकांमधून केली, परंतु त्यांच्या मेहनती, अनोख्या स्टाइल आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. त्यांचा साधा पण प्रभावी अभिनय आणि हटके अंदाज यामुळे ते आजही चाहत्यांचे लाडके आहेत. Video: सापासमोर ‘नागिन धून’ वाजवली तर… एका मुलाने केलेला प्रयोग कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हाल चकीत

रजनीकांत आणि लता यांची प्रेमकहाणी

रजनीकांत यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकंच रंजक राहिले आहे. त्यांची पत्नी लता यांच्याशी झालेली ओळख अतिशय अनपेक्षितपणे होती. लता तेव्हा चेन्नईतील एथिराज कॉलेजमध्ये शिकत होत्या. एका मुलाखतीसाठी त्या रजनीकांत यांना भेटल्या आणि त्या भेटीने त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या भेटीनंतर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि 1981 मध्ये त्यांनी लग्न केलं.

रजनीकांत आणि लता यांना दोन मुली आहेत – ऐश्वर्या आणि सौंदर्या. लता यांनी काही चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं आहे, परंतु त्या व्यावसायिक अभिनेत्री नाहीत. तरीही, त्यांनी एका चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. ‘अग्नि साची’ या 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांच्यासोबत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काम केलं. के. बालचंदर दिग्दर्शित या चित्रपटात शिवकुमार आणि सरिता यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर रजनीकांत आणि लता यांनी स्वतःच्या नावांनीच छोटीशी भूमिका केली होती.

रजनीकांत यांची जादू कायम

74 व्या वर्षीही रजनीकांत यांचा उत्साह आणि लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. त्यांचे चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर धमाल उडवतात आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दलचं प्रेम अढळ आहे. ‘कुली’ आणि ‘जेलर 2’ यांसारख्या आगामी चित्रपटांमुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रजनीकांत यांचा हा प्रवास केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर एका सुपरस्टारचा आहे, ज्याने आपल्या मेहनतीने आणि कलेने संपूर्ण जगाला आपलंसं केलं.

‘कुली’ आणि ‘जेलर 2’ ची उत्सुकता

‘कुली’ हा चित्रपट रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चा आहे. दुसरीकडे, ‘जेलर’ च्या यशानंतर ‘जेलर 2’ साठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार असून, नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.