AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या लग्नात जान्हवी कपूर हिने केला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत धमाकेदार डान्स, अखेर ‘तो’ व्हिडीओ…

जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे.

अंबानींच्या लग्नात जान्हवी कपूर हिने केला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत धमाकेदार डान्स, अखेर 'तो' व्हिडीओ...
Janhvi Kapoor
| Updated on: Jul 13, 2024 | 1:19 PM
Share

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी अत्यंत खास पद्धतीने मुंबई येथे पार पडले. या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. विशेष म्हणजे लग्नाच्या अगोदर अनेक ठिकाणी प्री वेडिंग फंक्शन ठेवण्यात आले. या लग्नासाठी देशच नाहीतर विदेशातूनही नामवंत व्यक्ती पोहोचल्या होत्या. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार लग्नामध्ये मोठ्या संख्यने डान्स करताना दिसले. अनिल कपूर यांच्यापासून ते जान्हवी कपूरपर्यंत सर्वचजण डान्स करताना अनंत आणि राधिकाच्या लग्नात दिसत आहेत.

सध्या काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी स्टेजवर जान्हवी कपूर ही बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत खास डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही देखील दिसत आहे. दोघी बहिणींसोबत मिळून डान्स करताना शिखर पहाडिया हा दिसत आहे.

लोकांना आता जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांची जोडी आवडताना दिसत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, दोघे एकमेकांवर किती जास्त प्रेम करतात. जान्हवी कपूर ही खास लूकमध्ये अनंतच्या लग्नात पोहोचली होती. फक्त लग्नच नाहीतर संगीत आणि हळदीमध्येही जान्हवी कपूर खास लूकमध्ये शिखरसोबत पोहोचली होती. आता लग्नामध्येही तर मस्त डान्स करताना शिखर आणि जान्हवी दिसले.

जान्हवी कपूर, शिखर पहाडिया आणि बोनी कपूर यांचा हळदीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. यामध्ये जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत हळदीच्या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी वडील बोनी कपूर यांना पाहून त्यांना भेटण्यासाठी जान्हवी जवळ आली. यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी घातल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नेहमीच हे एकसोबत स्पॉट होताना दिसतात. लवकरच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, अजूनही जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या रिलेशनबद्दल भाष्य केले नाहीये. सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना