तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्यांनी दिले प्रेक्षकांना चाॅकलेट, दयाबेनच्या पुनरागमनावर मोठा खुलासा

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना ही मालिका अधिक आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कलाकार हे सतत या मालिकेला सोडून जाताना दिसत आहेत. निर्मात्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्यांनी दिले प्रेक्षकांना चाॅकलेट, दयाबेनच्या पुनरागमनावर मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 1:15 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेली मालिका आहे. विशेष म्हणजे तब्बल पंधरा वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतंय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मालिकेला कलाकार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच थेट मालिकेचे निर्माता असित कुमाक मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. दयाबेन अर्थात दिशा वकानी ही देखील काही वर्षांपासून मालिकेत नाहीये. चाहते हे सतत दिशा वकानी हिला मिस करताना दिसत आहेत. दयाबेनच्या पुनरागमनाची वाढ चाहते पाहत आहेत.

दयाबेन मालिकेत येणार असल्याची चर्चा आहे. फक्त चर्चा नाही तर गोकुळधाम सोसायटीच्या सदस्यांनी दयाबेनच्या पुनरागमनाची तयारी देखील सुरू केलीये. मात्र, दयाबेनच्या भूमिकेत इतर कोणी अभिनेत्री की, दिशा वकानी हिच परत येणार याबद्दल फार जास्त काही माहिती ही अजूनही मिळू शकली नाहीये. आता यासंदर्भातील मोठे अपडेट पुढे आलंय.

दयाबेनच्या भूमिकेसाठी निर्माते असित कुमार मोदी यांनी तब्बल 200 जे 300 अभिनेत्रींचे ऑडिशन घेतल्या आहेत. इतकेच नाही तर दयाबेनचे स्वागत करण्यासाठी गोकुळधाम सोसायटीमध्ये नट्टू काका, बागा आणि बावरी हे पोहचले आहेत. यावेळी बावरी थेट म्हणते की, असा आभास होतोय की, दया भाभी आज येणार नाही.

बावरीचे हे बोलणे ऐकून नट्टू काका हे तिला शांत करताना दिसत आहे. मात्र, बावरीच्या बोलण्यातून हे स्पष्ट होत आहे की, लगेचच दयाबेन ही मालिकेत येणार नाहीये. म्हणजेच काय तर नेहमीप्रमाणेच निर्माते यावेळी देखील प्रेक्षकांना चाॅकलेट देताना दिसत आहेत. टीआरपी देखील तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचा कमी झाल्याचे बघायला मिळतंय.

दरवेळी निर्माते येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवतात की, दयाबेन ही तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दाखल होणार. मात्र, दरवेळी काहीतरी वेगळे कारण हे देण्यात येते. अनेक कलाकारांनी मालिका सोडल्याने मालिकेला याचा चांगलाच फटका कुठेतरी बसल्याचे बघायला मिळतंय. प्रेक्षक सतत दयाबेनच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.