Birthday Special : टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण, 340 कोटींच्या ब्लॉकबस्टरने केला धमाका, कोण आहे ती ?
Birthday Special : वेगवेगळ्या भूमिकांमधून मोठा दा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या कामाची सुरूवात, छोट्या पडद्यावरून अर्थात टीव्ही मालिकेतून केली. त्यानतंर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 340 कोटी कमाई करणाऱ्या तिच्या एका चित्रपटाने मोठा पडदा चांगलाच गाजवला. कोण आहे ती अभिनेत्री ?

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या करिअरची, अभिनयाची सुरूवात ही छोटा पडदा, अर्थात टीव्हीपासून केली आहे. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, तिनेही प्रथम टीव्ही मालिकांमध्येच काम करत करिअरची सुरूवात केली. त्यानंतर 12 वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं आणि कधीच मागे वेळून पाहिलं नाही. एवढ्या वर्षांत तिने एकाहून एक सरस, वेगळे आणि तूफान कमाई करणारे चित्रपट दिले, 6 वर्षांपूर्वी आलेला तिचा एक चित्रपट तर ब्लॉकबस्ट ठरला, शेकडो कोटींची कमाई त्याने केली. या सौंदर्यवतीने बॉलिवूडच्या एका हुशार, प्रख्यात दिग्दर्शकाशी लग्न केलं असून दोघंही सुखीजीवन जगत आहेत. तकाही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरी बाळाचेही आगमन झालं.
ही बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे यामी गौतम (Yami gautam). आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकणारी यामी गौतम हिचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 साली हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. तिने ‘उरी’ सारखा सुपरहिट चित्रपट दिलाच. पण तो दिग्दर्शित करणारा नामवंत डायरेक्टर आदित्य धर याच्याशी तिने लग्नही केल.
या मालिकेतून केलं अभिनयात पदार्पण
2008 साली यामी गौतमची अभिनय कारकीर्द सुरू झाली, जेव्हा ती वीस वर्षांची होती. “चांद के पार चलो” या टीव्ही मालिकेत यामी पहिल्यांदात दिसली. 17 वर्षे जुन्या या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर, यामी ‘ये प्यार ना होगा काम’ मध्ये दिसली. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली.
340 कोटींच्या सिनेमातही केलं काम
सध्या तिचा “हक” हा चित्रपट खूप गाजतोय, यातील यामीच्या कामाचही खूप कौतुक झाला. मात्र तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर “विकी डोनर” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात आयुष्मान खुरानासोबत तिची प्रमुख भूमिका होती. हा त्या दोघांचाही पहिला चित्रपट होता. यामीने तिच्या कारकिर्दीत 340 कोटी कमावणारा ब्लॉकबस्टर चित्रपटही दिला आहे. हा चित्रपट म्हणजे “उरी: द सर्जिकल स्ट्राईक”, ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. उरीचे बजेट 42 कोटी होते, पण त्याने तूफान यश मिळवत प्रचंड कमाई केली.
यामीचे नेटवर्थ
उरी हा चित्रपट आदित्य धर याने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या सेटवर यामी तिच्या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली. दोघांनी 2021 साली लग्न केले. तर गेल्या वर्षी म्हणजे, 2024 मध्ये या जोडप्याने त्यांचा मुलगा वेदविदचे स्वागत केले. यामीच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर तिची संपत्ती 40 कोटींच्या आसपास आहे. एक चित्रपटासाठी ती कोट्यवधींची फी आकारते.
