Guess Who: नेपाळी उद्योजकासोबत लग्न करणं अभिनेत्रीला पडलं महागात, आता जगतेय असं आयुष्य
Guess Who: अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला, यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली, पण खासगी आयुष्यात मिळालं अपयश... नेपाळी उद्योजकासोबत लग्न करणं अभिनेत्रीला पडलं महागात... म्हणाली...

Guess Who: 90 च्या दशकात हिंदी सिनेमात अनेक एकापेक्षा एक अभिनेत्रींनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. तो काळ बॉलिवूडचा गोल्डन काळ म्हणून देखील ओळखला जातो. 90 च्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी स्वतःचं स्थान भक्कम केलं आणि फक्त भारतातच नाही तर, सातासमुद्रा पार देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आजही त्या अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सांगायचं झालं तर, त्यामधील काही अभिनेत्रींच्या आयुष्यात वैवाहित सुख देखील आलं. पण काही अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात फक्त आणि फक्त यातना आल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मनिषा कोईराला.
मनिषा कोईराला हिने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात वैवाहिक आयुष्याचं सुख कधीच आलं नाही. एक दोन नाही तर, तब्बल 12 सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक सम्राट दलाल याच्यासोबत लग्न केलं. पण मनिषा आणि सम्राट यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. आता अभिनेत्री वयाच्या 55 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे.
2010 मध्ये झालेलं मनिषा कोईराला हिचं लग्न
एका नेपाळी उद्योजकासोबत लग्न करणाऱ्या मनीषाचं भारताच्या शेजारील देश नेपाळशीही संबंध आहेत. तिचा जन्म नेपाळमध्ये झाला आणि तिचं लग्नही नेपाळमध्येच झालं. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये जन्मलेल्या मनीषाने 2010 मध्ये नेपाळी रितीरिवाजांनुसार उद्योजक सम्राट दहलशी लग्न केलं. हे लग्न काठमांडूमध्ये झालं.

फाईल फोटो
2 वर्षात झाला घटस्फोट
सांगायचं झालं तर, जवळपास 40 व्या वर्षी मनिषा हिने 7 वर्ष लहान सम्राट याच्यासोबत लग्न केलं. 2023 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं होतं. .’लग्नबद्दल माझं एक स्वप्न होतं. जर तुम्ही कोणत्या वाईट नात्यामध्ये असाल तर, लवकरात-लवकर अशा नात्यातून बाहेर निघायला हवं. यामध्ये वाईट असं काहीही नाही. मी घाईमध्ये लग्न केलं, मी म्हणाली होती घाईत लग्न करण्याची सर्व जबाबदारी मी घेते… माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम दधीच नव्हतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
मनिषा कोईराला हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर मनिषा हिने ‘1942: ए लव स्टोरी’, ‘दिल से’, ‘मन’, ‘लज्जा’, ‘कच्चे धागे’, ‘खामोशी’, ‘हिन्दुस्तानी’ आणि ‘लाल बादशाह’ यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली. सोशल मीडीयावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
