Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुन – रश्मिकासोबत ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

ही प्रसिद्ध अभिनेत्री सीक्वेलमध्ये रश्मिका मंदानाची जागा घेणार असल्याची चर्चा होती. मात्र रश्मिकासोबतच ती चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्याचं कळतंय. पुष्पा 2 चं शूटिंग यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपणार असल्याचं समजतंय.

Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुन - रश्मिकासोबत 'ही' लोकप्रिय अभिनेत्री साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Pushpa: The RiseImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:03 AM

हैदराबाद : ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षकांना त्याच्या सीक्वेलची उत्सुकता निर्माण झाली आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘पुष्पा : द रूल’मध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची टक्कर पहायला मिळणार आहे. पुष्पासोबतच श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना यामध्ये मुख्य भूमिकेत असेल. मात्र त्याचसोबत या चित्रपटात आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीणी वर्णी लागली आहे. या अभिनेत्रीने होळीच्या मुहूर्तावर शूटिंगलाही सुरुवात केल्याचं कळतंय.

पुष्पा 2 हा पहिल्या भागापेक्षा अधिक रंजक करण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांचा आहे. त्यामुळे या सीक्वेलमध्ये दमदार कलाकारांची वर्णी लागली आहे. त्यातच आता या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या भूमिकेसाठी ती दहा दिवस शूटिंग करणार आहे. पुष्पा 2 मध्ये साई एका आदिवासी मुलीची भूमिका साकारणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका आणि साई पल्लवी हे त्रिकोण जेव्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसेल, तेव्हा प्रेक्षकांचीही उत्सुकता ताणली गेली असेल.

हे सुद्धा वाचा

पुष्पा 2 चं शूटिंग यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपणार असल्याचं समजतंय. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त एप्रिल महिन्यात या चित्रपटाची छोटी झलक प्रदर्शित होणार आहे. स्टायलिश स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी ही खास भेट असेल.

या चित्रपटात साई पल्लवी एका साहसी आदिवासी मुलीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत तिला 20 मिनिटांचा स्क्रीन टाइम दिला जाईल. मात्र ही भूमिका कथेसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. साईने जर ही भूमिका नाकारली तर निर्माते अभिनेत्री ऐश्वर्या राजेशला ती ऑफर देतील, अशीही चर्चा होती. मात्र साईने ही भूमिका आता स्वीकारली आहे.

पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता सीक्वेल आणखी रंजक करण्याच्या प्रयत्नात निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्यामुळे सीक्वेलमधील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी RRR स्टार रामचरणलाही विचारण्यात आल्याचं समजतंय. अल्लू अर्जुन आणि रामचरणने ‘रंगस्थलम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता.

12 डिसेंबरपासून ‘पुष्पा 2’च्या शूटिंगला सुरुवात झाली. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटातही स्टार कॅमिओचा फंडा वापरण्यात आला होता. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला खुद्द अल्लू अर्जुनने विनंती केली होती. त्यानंतर तिने करिअरमधला पहिला आयटम साँग ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी केला होता. समंथा आणि अल्लू अर्जुनचं ‘ऊ अंटावा’ हे गाणं तुफान गाजलं होतं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.