या अभिनेत्रीवर का लागला अँटी हिंदू असण्याचा आरोप ? दिवाळीत झाला गदारोळ
जेव्हा संपूर्ण देश दिवाळी साजरी करण्यात, त्याचा आनंद घेण्यात व्यस्त होता, तेव्हा या सौंदर्यवतीने असं काही केलं ज्यामुळे चहूबाजूंनी मोठा गदारोल झाला. सोशल मीडियावर ती खूप ट्रोल झाली, ती अँटी हिंदूही म्हटलं गेलं. कोण आहे ती अभिनेत्री, नेमकं काय झालं ?

टीव्ही मालिकांमुळे अभिनेते-अभिनेत्री घराघरांत पोहोचतात, त्यांना खूप लोकप्रियता मिळते, अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘छोटी बहू’ मधली राधिका. तिचं कॅरॅक्टर साकारून घरादारांत पोहोचून, प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री, रुबिना दिलैक. तिची काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. ती तिच्या बिनधास्त अंदाजामुळे, प्रखर, परखड वक्त्व्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2023 साली देखील रुबिनाने एक आश्चर्यकारक, धक्कादायक विधान केलं होतं.
मात्र त्यामुळे मोठा हंगामा झाला, बरा गदारोळ माजला. एवढंच नव्हे तर काही लोक तिच्यावर एवढे भडकले की तिला थेट अँटी हिंदू ही म्हणू लागले. सोशल मीडियावर सगळीकडे दिवाळीचं, उत्सवाचं, आनंदाचं वातावरण होतं, तेव्हा रुबिनाच्या एका ट्विटमुळे प्रचंड गोंधळ झाला.
View this post on Instagram
TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या स्टारने घेतला मोठा निर्णय, आता चक्क…
काय होती रुबिनाची पोस्ट ?
या पोस्टमध्ये, तिने लिहीलं की लिहिले, “सर्व संबंधितांना ! दिवाळी संपली आहे, (आता) फटाके फोडणे थांबवा…” 10 नोव्हेंबरपासून पहाटे 3 वाजेपर्यंत फटाके सतत फोडले जात आहेत..आता पुरे झालं.. वायू प्रदूषण आधीच आहे, ध्वनी प्रदूषण झोप हिरावून घेतंय…” अशा शब्दांत तिने ही पोस्ट लिहीली होती.
मग काय ! तिचं हे बोलणं, सल्ला, अनेक लोकांना आवडलाच नाही. तिचं ट्विट बऱ्याच लोकांना पटलं नाही. त्यांनी तिला ट्रोल केल, टीका केली, पण काही लोकांनी तर तिच्यावर, ती हिंदू सणांना विरोध करत असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. एवढंच नव्हे तर लोकांनी तिचे शो आणि चित्रपटही बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते.
हा वाद एवढ्यावरचं थांबला नाही, अनेक यूवापरकर्त्यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्याची आणि माफी मागण्याची मागणीही केली. रुबिनाने ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले. “हिंदूविरोधी??? तुम्ही खरोखरच वेडे आहात का?” असा खड़ा सवाल तिने टीकाकारांना विचारा. त्यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लिहीलं होतं की मी सणांच्या विरोधात नाही, पण इतरांच्या झोपेला आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींच्या विरोधात आहे. तिची पोस्ट खूपच गाजली होती.
