अत्यंत क्रूर खलनायक साकारणाऱ्या या अभिनेत्याकडून होणार रावण दहन
दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने दिल्लीतील लाल किल्ला मैदानात रावणदहन केलं जातं. यंदा रावण दहनासाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. या अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर अत्यंत क्रूर खलनायक साकारला आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध ठिकाणी रामलीलाचं आयोजन केलं जातं. दिल्लीतील ‘लव कुश रामलीला’ ही देशभरात प्रसिद्ध आहे. यंदाची ही रामलीला अत्यंत खास ठरणार आहे. कारण चित्रपटात अत्यंत क्रूर खलनायक साकारणारा अभिनेता या रामलीलामध्ये सहभागी होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी हा अभिनेता लाल किल्ल्याच्या मैदानावर रावणाचं दहन करणार आहे. असत्यावर सत्याचा विजय होतो, नकारात्मकतेवर सकारात्मकेचा विजय होतो याचा संदेश देण्यासाठी रावण दहन केलं जातं. दिल्लीत होणाऱ्या या रावण दहनाची देशभरात चर्चा होते. ज्या अभिनेत्याच्या हस्ते रावण दहन होणार आहे, तो दुसरा-तिसरा कोणी नसून बॉबी देओल आहे. लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहन करण्यासाठी अभिनेता बॉबी देओलला आमंत्रण दिलं होतं. त्याने हे आमंत्रण अत्यंत उत्साहाने स्वीकारलं आहे. बॉबीच्या उपस्थितीने यंदाची रामलीला अविस्मरणीय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी खुद्द बॉबीसुद्धा आनंदी आणि उत्साही आहे. “दिल्लीच्या लाल किल्ला मैदानात होणाऱ्या भव्य लव कुश रामलीलामध्ये मी सहभागी होणार आहे. तर भेटुयात दसऱ्याला”, असं त्याने म्हटलंय. दसऱ्याच्या दिवशी हे ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो लोक दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर जमतात. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी बॉबी देओलसुद्धा खूप उत्सुक आहे. तर बॉबीचं नाव समोर आल्यानंतर चाहतेसुद्धा खुश आहेत.
View this post on Instagram
बॉबी देओलने ‘ॲनिमल’ या चित्रपटात अत्यंत क्रूर अशी भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याची भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळालं. ‘ॲनिमल’नंतर तो ‘कंगुवा’ या दाक्षिणात्य चित्रपटातही झळकला होता. नुकताच तो आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुख खानचा मुलगा आर्यनने या सीरिजद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. या सीरिजमुळेही बॉबी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला. मधल्या काळात बॉबीला अपेक्षित असे ऑफर्स मिळत नव्हते. परंतु ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे पुन्हा त्याचं नशीब चमकलं आहे.
