AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अचानक चर्चेत आली ही सीरिज, पाहताना देखील अंगावर येतो काटा

इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाच्या आणि वाढत चाललेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड चर्चेत आली ही सीरिज. पाहताना अंगावर येतो काटा.

इराण आणि इस्रायलच्या संघर्षात अचानक चर्चेत आली ही सीरिज, पाहताना देखील अंगावर येतो काटा
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 27, 2026 | 4:32 PM
Share

सध्या जगभरात इराण आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आकाशात उडणाऱ्या क्षेपणास्त्रांपासून ते जमिनीवरील संघर्षापर्यंत. दोन्ही देशांमधील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवरच मनोरंजन क्षेत्रात एक नवी स्पाय-ड्रामा सीरिज चर्चेत आली असून तिने प्रेक्षकांमध्ये मोठी खळबळ उडवली आहे.

इराणच्या सरकारी दूरदर्शनने नुकतीच ‘नाइट लाइट’ ही ड्रामा सीरिज प्रदर्शित केली आहे. ही सीरिज केवळ कथानकामुळेच नाही तर तिच्या राजकीय संदर्भामुळेही चर्चेत आहे. अनेकजण या सीरिजकडे तेहरान या लोकप्रिय इस्रायली शोला दिलेलं प्रत्युत्तर म्हणून पाहत आहेत.

‘तेहरान’ विरुद्ध ‘नाइट लाइट’

Apple TV+ वरील ‘तेहरान’ या सीरिजमध्ये इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या महिला एजंटची कथा दाखवण्यात आली होती, जी इराणच्या सुरक्षा यंत्रणेत घुसखोरी करते. मात्र ‘नाइट लाइट’ची कथा पूर्णपणे वेगळी दिशा दाखवते. या सीरिजमध्ये ‘रामोस’ नावाच्या परदेशी महिला गुप्तहेराला इराणमध्ये घुसखोरी करताना दाखवले आहे, ज्याचा उद्देश देशातील शांतता भंग करणे हा आहे. पण इथे नायक आहेत इराणी गुप्तचर अधिकारी, जे आपल्या हुशारीने आणि सतर्कतेने अशा परकीय कटकारस्थानांना हाणून पाडतात.

ही 30 भागांची मोठी सीरिज फारसी नववर्ष ‘नवरोज’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहे. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, या सीरिजची कथा काही अंशी वास्तविक घटनांवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. यात इराणी सुरक्षा यंत्रणांनी देशातील गुप्तहेर नेटवर्क आणि तोडफोडीच्या कारवाया कशा उधळून लावल्या हे दाखवण्यात आले आहे.

रिलीज टाइमिंगवर प्रश्नचिन्ह

या सीरिजच्या रिलीजच्या वेळेबाबत तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात तणावपूर्ण, युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रकारच्या सीरिजचे प्रदर्शन हे केवळ योगायोग नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा कथा प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यास मदत करतात, असेही विश्लेषक सांगतात.

गेल्या काही दिवसांत इराणमध्ये इस्रायल आणि अमेरिकेसाठी हेरगिरी करणाऱ्यांच्या अटकांची प्रकरणे वाढल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा वेळी ‘नाइट लाइट’सारखी सीरिज एक स्पष्ट संदेश देते—इराणी भूमीत घुसखोरी करणे अत्यंत कठीण आहे. ही सीरिज केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, जागतिक पातळीवर इराणची प्रतिमा एक मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र म्हणून मांडण्याचा प्रयत्न असल्याचेही मानले जात आहे.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.