‘मिस्टर इंडिया’मधील चिमुकली टीना आठवतेय? आता दिसते इतकी सुंदर की ओळखणेही कठीण
मिस्टर इंडिया या चित्रपटातील बच्चे कंपनीमधील ही चिमुकली टीना आठवत असेलच. तिची निरागसता आणि गोंडस चेहरा आजही सर्वाच्या लक्षात आहे. तिच्या भूमिकेलाही खूप पसंती मिळाली होती. पण ही चिमुकली आज कशी काय करतेय हे अनेकांना माहित नाही. तसेच ही टीना आता मोठ्यापणी इतकी सुंदर दिसते की तिला ओळखणेही कठीण आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे लहाणपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याचपद्धतीने बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केलेल्या कलाकारांना मोठ्यापणी ओळखंणेही कठीण होऊन जाते. कारण त्यांची रुपरेखा पूर्णपणे बदलेली असते. अशाच एका बालकलाकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील चिमुकली टीना
ही बालकलाकार आहे ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील चिमुकली टीना. मिस्टर इंडिया हा चित्रपट कल्ट चित्रपटांपैकी एक आहे ज्याची चर्चा तेव्हाही होती आणि आजही. हा चित्रपट 37 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला असला तरी, त्याचे संवाद आणि गाणी अजूनही प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.
चित्रपटातील प्रत्येक पात्र लोकप्रिय
शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’मध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या , पण चित्रपटातील प्रत्येक पात्र लोकप्रिय झाले. मग ते मोगॅम्बो म्हणजे अमरीश पुरी असो की, कॅलेंडर म्हणजे सतीश कौशिक असो किंवा अरुण, उर्फ मिस्टर इंडियाची बच्चा कंपनी असो, प्रत्येकाची एक खास भूमिका आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मिस्टर इंडिया म्हणजे अनिल कपूरची जी बच्चे कंपनी दाखवली आहे त्यातीलच एक होती टीना.
जिच्या तिच्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजही तिचा हा गोंडस चेहरा सर्वांच्या लक्षात आहे. सुपरहिट चित्रपटातून लोकप्रियता असूनही, ती आज इंडस्ट्रीतून गायब आहे. पण ती आता कशी दिसते हे पाहिल्यावर कोणालाही ती ओळखू येणार नाही. ती कुठे आहे आणि ती आता काय करते जाणून घेऊयात.
लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर
मिस्टर इंडियामध्ये टीना म्हणून लाखो लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री हुजान खोदाईजीने इतर स्टार किड्सप्रमाणे अभिनेत्री म्हणून करिअर केले नाही. हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने स्वतःला लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर केले.
- Huzaan Khodaiji
ती आता खूपच सुंदर दिसते
बोनी कपूर निर्मित हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हुजान फक्त 6 वर्षांची होती. आज ती 43 वर्षांची आहे. हुजान दोन सुंदर मुलींची आई देखील आहे. ती प्रसिद्धीपासून दूर आहे. आणि सोशल मीडियावरही ती फार नाही. काही वर्षांपूर्वी, अभिनेत्री शोनाली नागराणीने टीनासोबतचा एक फोटोशेअर केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आणि मुख्य म्हणजे तिला ओळखणे कठीण आहे.
हुजानने चित्रपटसृष्टी का सोडली?
हुजानला लाइमलाइट आणि अटेंशनमुळे फार लाज वाटायची.एका मुलाखतीत तिने स्वतः हे सांगितले होते की, “चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होताच मी मद्रासला निघाले. माझ्या पालकांचा मित्र कास्टिंग डायरेक्टर होता. मी ऑडिशनसाठी गेले आणि माझी निवडही झाली. त्यानंतर, मी काही जाहिराती देखील केल्या पण त्या वातावरणात मी फार अस्वस्थ अनुभव करायचे. म्हणून मी पुढे या क्षेत्रात काम केलं नाही”. सध्या चित्रपटांपासून दूर असलेली हुजान मार्केटिंगमध्ये करिअर केले. ती एका कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे.
