AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | ‘मी या सगळ्याकडे लक्ष देत नाही’, ‘जेठालाल’सोबतच्या वादावर ‘टप्पू’ची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून जेठालाल आणि टप्पू या शोच्या मुख्य पात्रांमध्ये वाद सुरु असल्याची बरीच चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की, जेठालाल साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि टप्पू साकारणारा राज अंदकत (Raj Anadkat) यांच्यात काहीतरी बिनसले आहे.

TMKOC | ‘मी या सगळ्याकडे लक्ष देत नाही’, ‘जेठालाल’सोबतच्या वादावर ‘टप्पू’ची प्रतिक्रिया
दिलीप जोशी आणि राज अंदकत
| Updated on: Jun 01, 2021 | 11:23 AM
Share

मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) हा प्रत्येक घरात पहिला जाणार कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम बर्‍याच वर्षांपासून टीव्हीवर प्रसारित होत आहे आणि त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या हृदयात वसले आहे. आता गेल्या काही दिवसांपासून जेठालाल आणि टप्पू या शोच्या मुख्य पात्रांमध्ये वाद सुरु असल्याची बरीच चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की, जेठालाल साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि टप्पू साकारणारा राज अंदकत (Raj Anadkat) यांच्यात काहीतरी बिनसले आहे. यापूर्वी जेव्हा दिलीप जोशी यांना याबाबत विचारणा केली गेली होती, तेव्हा त्यांनी या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. आता जेव्हा राजला याबाबत विचारले गेले, तेव्हा त्याने देखील बेधडक प्रतिक्रिया दिली आहे (TMKOC Tappu fame Raj Anadkat reacted on clashes with dilip joshi news).

स्पॉटबॉयशी बोलताना राज म्हणाले की, ‘मी अशा अफवांकडे लक्ष देत नाही. मी फक्त माझे काम शक्य तितके चांगले करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेणेकरुन प्रेक्षकांना माझे काम आवडेल. लोक फक्त गोष्टी तयार करतात. परंतु मी त्यावर हसतो आणि त्या टाळतो. मी या सगळ्याकडे लक्ष देत नाही. आमचे सर्व काही ठीक सुरु आहे.’

बातमी का चर्चेत आली?

राज दररोज सेटवर उशिरा येतो आणि त्यामुळे अभिनेते दिलीप जोशी यांना शुटींगसाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागते, अशा बातम्या समोर आल्या होत्या. राजला सतत उशीरा होत असल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. तथापि, आता दोन्ही स्टार्सनी ही चर्चा चुकीची असल्याचे सांगितले होते. यामुळे त्यांचे चाहते यांना पुन्हा एकदा आनंद झाला आहे (TMKOC Tappu fame Raj Anadkat reacted on clashes with dilip joshi news).

तसे, यापूर्वीही जेठालाल आणि तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले होते. असं बोललं जात होतं की, दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे आणि दोघेही सेटवर एकमेकांशी बोलत नाहीत. असेही म्हटले जात होते की, शूटिंगनंतर दोघेही आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातात आणि एकमेकांशी बोलत नाहीत. त्यावेळी ही बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला होता. कारण खऱ्या आयुष्यात दोघांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते.

शैलेश यांनी सांगितले सत्य

शैलेश लोढा यांनी या वृत्तांना फेटाळून लावत, या अफवा असल्याचे म्हटले होते. त्यांनी सांगितले होते की, शो प्रमाणेच वास्तविक जीवनातही त्यांची आणि दिलीप यांची चांगली मैत्री आहे. दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत. शैलेश म्हणाले की, अशा बातम्या ऐकून मला खूप हसू येते. यासह ते असेही म्हणाले की, अशा खोट्या बातम्या कोण व्हायरल करतं, हेच मला समजत नाही.

(TMKOC Tappu fame Raj Anadkat reacted on clashes with dilip joshi news)

हेही वाचा :

‘ये रिश्ता क्या…’ फेम अभिनेता करण मेहराला रात्रभर खावी लागली तुरुंगाची हवा, पत्नीने दाखल केली होती तक्रार!

Kundali Bhagya : कोण आहे श्रद्धा आर्या?, कुंडली भाग्य मालिकेनं दिली खास ओळख…

(TMKOC Tappu fame Raj Anadkat reacted on clashes with dilip joshi news)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.