पुरस्कार मिळवण्यासाठी आधी फॉर्म अन् अडीच लाख रुपये भरा, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांना अजब ऑफर!

प्रसिद्ध आहारतज्ज्ञांमध्ये ऋतुजा दिवेकर (Rutuja Divekar) यांचं नावं पहिल्या क्रमांकावर आहे. ऋतुजा सगळ्या सेलीब्रेटींच्या आवडत्या आहारतरज्ज्ञ आहेत.

पुरस्कार मिळवण्यासाठी आधी फॉर्म अन् अडीच लाख रुपये भरा, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांना अजब ऑफर!
ऋतुजा दिवेकर

मुंबई : रोजच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामासोबतच आहार देखील अतिशय महत्त्वाचा असतो. बॉलिवूडची कलाकार मंडळी तर याची विशेष काळजी घेतात. यासाठी ते अनेकदा आहारतज्ज्ञांची मदत घेतात. या प्रसिद्ध आहारतज्ज्ञांमध्ये ऋतुजा दिवेकर (Rutuja Divekar) यांचं नावं पहिल्या क्रमांकावर आहे. ऋतुजा सगळ्या सेलीब्रेटींच्या आवडत्या आहारतरज्ज्ञ आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मात्र, नुकताच एका पुरस्कारासंबंधित एक अजब किस्सा त्यांच्यासोबत घडला आहे.

ऋतुजा दिवेकर यांनी हा प्रकार ट्विटर द्वारे सगळ्यांसमोर आणला आहे. ऋतुजा देवेकर यांना एक मीडिया कंपनी पुरस्कार देऊ इच्छित होती. मात्र, या पुरस्कारासाठी त्यांना एक फॉर्म भरायचा होता. इतकंच नाही तर, त्यासोबत त्यांना तब्बल अडीच लाख रुपये इतकी रक्कम देखील भरण्यास सांगण्यात आली होती.

पाहा ऋतुजा दिवेकर यांचे ट्विट

या ट्विटनंतर ऋतुजा दिवेकारांना अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या अज्ञात मीडिया कंपनीला बोल लगावले आहेत, तर काहींनी यावर विनोद केले आहेत.

कोण आहेत ऋतुजा दिवेकर?

ऋतुजा दिवेकर या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ असून, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी स्लीम-ट्रीम राहण्यासाठी त्यांच्या टिप्सचा आधार घेतात. मागील काही वर्षांत आहारतज्ज्ञ म्हणून ऋजुता दिवेकर यांचे नाव खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ऋतुजा दिवेकर यांच्या फिटनेस मंत्राचे कौतुक केले होते. भात-आमटी, पोळी-भाजी या चौरस आहाराचे महत्व त्या नेहमीच पटवून देतात.

(To get the award, first fill the form and Rs. 2.5 lakhs, weird offer to celebrity dietician Rituja Divekar)

हेही वाचा :

कोलकाता अश्लील चित्रपट प्रकरण, ‘नॅन्सी भाभी’ने सांगितली या काळ्या जगतातील गुपित!

किशोर कुमारांची झाली होती 4 लग्न, त्यातील एक आता मिथुन चक्रवर्तींची पत्नी!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI