AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toxic Teaser: कधी कारमध्ये तर कधी फाईटिंग करताना, प्रत्येक सेकंदाला यशचे बोल्ड सीन, ‘टॉक्सिक’च्या टीझरची हवा!

Toxic Teaser Release: गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' हा सिनेमा चर्चेत आहे. यशने कारमध्ये दिलेल्या बोल्ड सीनने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता या सिनेमाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Toxic Teaser: कधी कारमध्ये तर कधी फाईटिंग करताना, प्रत्येक सेकंदाला यशचे बोल्ड सीन, 'टॉक्सिक'च्या टीझरची हवा!
Toxic TeaserImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 3:03 PM
Share

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटांची कथा, भव्यदिव्य सेट आणि कलाकारांची भरती यामुळे दाक्षिणात्य सिनेमे पाहायला प्रेक्षकांना फार आवडत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सीनेमात यशने कारमध्ये दिलेल्या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा रंगली. आता या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

काय आहे टीझरमध्ये?

‘टॉक्सिक‘ सिनेमाचा दीड मिनिटांचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या टीझरमध्ये अॅक्शन आणि बोल्डनेसचा मारा असल्याचे दिसत आहे. तसेच या चित्रपट बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींची वर्णी असल्याचे देखील दिसत आहे. यशने काही मिनिटांमध्येच चाहत्यांची मने जिंकली आहेत. यशच्या’टॉक्सिक’चा टीजर ज्या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे, ते आहे ‘लेडीज अँड लेडीज.’ १ मिनिट ४१ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये यशचे अनेक इंटिमेट सीन पाहायला मिळत आहेत. याशिवाय नयनतारा एकटीच भाव खाऊन गेली आहे. टीजरमध्ये नयनतारा कधी बाइक चालवताना, तर कधी बंदुकीने खेळ खल्लास करताना दिसते. या टीजरमध्ये पाच सुंदर अभिनेत्रींच्या घेरावात यश फसलेले दिसत आहेत.

पाच अभिनेत्रींची एण्ट्री

टीजरची सुरुवात डेंजर सायरनने होते. टीजरमध्ये प्रथम समुद्रकिनाऱ्यावर यशसोबत कियारा आडवाणी दिसते. त्यानंतर स्क्रीनवर बाइक वेगाने येताना दाखवली आहे. ही बाईक नयनतारा चालवत आहे. नयनताराचा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. त्यानंतर कियारा आडवाणी पूर्ण मेकअपमध्ये यशची लव इंटरेस्ट म्हणून एंट्री करते. टीजरमध्ये यशची एंट्री झाल्यानंतर तारा सुतारिया देखील दिसते. तिचा लूक जबरदस्त आहे. रुक्मिणी वसंत साध्या लूकमध्ये दिसत असली तरी चित्रपटात ती जोरदार अॅक्शन करणार असल्याचे संकेत मिळतात. तिच्या हातात बंदूकही दिसते. हुमा कुरैशीचा लूकही अत्यंत आकर्षक आणि धाडसी आहे.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

यशचा टॉक्सिक हा सिनेमा धुरंधर 2 सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हाच प्रदर्शित होणार होता. पण दिग्दर्शकांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा सिनेमा 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहिल्यानंतर आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...