AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV प्रेमींसाठी मोठी बातमी! DTHच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ‘या’ नव्या नियमांबद्दल…

डीटीएचने प्रत्येकाचा टीव्ही पाहण्याचा अनुभव बदलला आणि ग्राहकांना थेट ब्रॉडकास्टरशी कनेक्ट केले. या तंत्रातमुळे टीव्ही क्षेत्रात बरेच बदल घडले.

TV प्रेमींसाठी मोठी बातमी! DTHच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ‘या’ नव्या नियमांबद्दल...
| Updated on: Dec 31, 2020 | 1:07 PM
Share

मुंबई : डायरेक्ट टू होम (डीटीएच) आणि केबलद्वारे आपल्या टेलिव्हिजन सेटवर अर्थात टीव्हीवर शेकडो चॅनेल दिसतात. डीटीएचने प्रत्येकाचा टीव्ही पाहण्याचा अनुभव बदलला आणि ग्राहकांना थेट ब्रॉडकास्टरशी कनेक्ट केले. या तंत्रातमुळे टीव्ही क्षेत्रात बरेच बदल घडले. डीटीएचच्या माध्यमातून लोकांना एचडी चॅनेल पाहण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने त्यात बरेच बदल केले आणि ग्राहकांच्या सोयीसाठी काही नियम बनवले. या नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या काय आहेत हे नियम? (TRAI change rules for DTH service provider)

डीटीएच कंपन्या ग्राहकांना कोणत्या सुविधा देतील व त्यांना कोणते फायदे मिळतील, हे ठरवण्यासाठी ट्रायने नियम बनवले आहेत. परंतु, माहितीअभावी डीटीएच ग्राहक बर्‍याच सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. याअंतर्गत जे वापरकर्ते विनामूल्य डीटीएच वापरत आहेत, त्यांचादेखील ट्राय नियमात समावेश करण्यात आला आहे.

डीटीएच कंपन्या ग्राहकावर दबाव निर्माण करू शकत नाहीत!

ट्रायच्या नियमांनुसार, ग्राहक जितके चॅनेल पाहू इच्छितात, त्याच चॅनेलसाठी त्यांना पैसे द्यावे लागतील. तसेच, केबल टीव्ही ऑपरेटर आणि डीटीएच सेवा प्रदाता ग्राहकांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी सदैव तयार असलेच पाहिजेत. टीव्ही कनेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास डीटीएच कंपन्यांच्या कॉल सेंटरची तरतूद आहे, जिथे ग्राहक यासंबंधित आपली तक्रार नोंदवू शकतात.

याव्यतिरिक्त डीटीएच कंपन्या कोणत्याही ग्राहकांना जबरदस्ती चॅनेल निवडण्यास भाग पाडू शकत नाहीत. डीटीएचसेवा केबल सेवेपेक्षा महाग आहे. परंतु, उत्कृष्ट सिग्नल आणि व्हिडीओ गुणवत्तेमुळे, लोक डीटीएच सेवेला प्राधान्य देतात (TRAI change rules for DTH service provider).

ट्राय म्हणजे काय?

ट्राई ही एक सरकारी संस्था आहे, जी नेटवर्क प्रदाता कंपन्यांवर नजर ठेवते. 20 फेब्रुवारी 1997 रोजी टेलिकॉम सेवा नियमित करण्यासाठी ट्रायची स्थापना करण्यात आली. ‘ट्राय’ सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देते, जेणेकरून ग्राहकांना चांगली सेवा मिळेल. ट्रायने या वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही केबल आणि डीटीएचसाठी नवीन नियम आणले. हे नियम सेवा प्रदात्यांमधील विवादांच्या सर्व समस्यांचे निराकरण करतील.

ISROचा नवा उपग्रह व्हिडीओ क्वॉलिटी सुधरणार!

संस्था इस्रोने 17 डिसेंबर रोजी आपला नवीन संचार उपग्रह CMS-01 यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसर्‍या लाँच पॅडवरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. हा संचार उपग्रह दूरदर्शन, टेली एज्युकेशन, टेलिमेडिसीन आणि आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासह दूरसंचार सेवा प्रदान करणार आहे. यामुळे देशात आधीच कार्यरत असलेल्या संचार सेवा आणखी सुधारतील. 1410 किलो वजनाचा CMS-01 उपग्रह GSAT-12 दूरसंचार उपग्रहाची जागा घेणार आहे. हा देशाचा 42वा संचार उपग्रह आहे. CMS-01 हा उपग्रह सात वर्षे सेवा देईल. हा उपग्रह वारंवारता स्पेक्ट्रमची विस्तारित सी बँड सेवा तसेच अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये संचार सेवा प्रदान करण्यास सक्षम असेल.

(TRAI change rules for DTH service provider)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.