ISROचे नवे उड्डाण! टीव्ही-मोबाईलच्या व्हिडीओ क्वॉलिटीवर परिणाम, जाणून घ्या नेमकं काय होणार?

यावर्षी अवकाश जगातातील संशोधनात बरेच यश मिळाले. तब्बल एक दशकानंतर अंतराळवीरांचे उड्डाण, चंद्रावरून आणि एका लघुग्रहावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आले.

ISROचे नवे उड्डाण! टीव्ही-मोबाईलच्या व्हिडीओ क्वॉलिटीवर परिणाम, जाणून घ्या नेमकं काय होणार?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 5:18 PM

मुंबई : यावर्षी अवकाश जगातातील संशोधनात बरेच यश मिळाले. तब्बल एक दशकानंतर अंतराळवीरांचे उड्डाण, चंद्रावरून आणि एका लघुग्रहावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आले. या संशोधनांनी 2020या वर्षाला ऐतिहासिक बनवले. त्याचबरोबर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गुरुवारी (17 डिसेंबर) आपला नवीन संचार उपग्रह CMS-01 यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसर्‍या लाँच पॅडवरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला (ISRO Launched new communication satellite for better quality of television and mobile video quality).

हा नवीन संचार उपग्रह काय आहे?

हा संचार उपग्रह दूरदर्शन, टेली एज्युकेशन, टेलिमेडिसीन आणि आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासह दूरसंचार सेवा प्रदान करणार आहे. यामुळे देशात आधीच कार्यरत असलेल्या संचार सेवा आणखी सुधारतील. 1410 किलो वजनाचा CMS-01 उपग्रह GSAT-12 दूरसंचार उपग्रहाची जागा घेणार आहे. हा देशाचा 42वा संचार उपग्रह आहे. CMS-01 हा उपग्रह सात वर्षे सेवा देईल. हा उपग्रह वारंवारता स्पेक्ट्रमची विस्तारित सी बँड सेवा तसेच अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये संचार सेवा प्रदान करण्यास सक्षम असेल.

काय आहेत याची वैशिष्ट्ये?

CMS-01 हा उपग्रह टेलिकॉम सेवांमध्ये बरेच चांगले बदल करेल. यामुळे टीव्हीवरील व्हिडीओ क्वॉलिटीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. देशात, सिग्नल खूप मजबूत असेल, तर दूरचित्रवाणीवरील प्रसारणाची गुणवत्ता सुधारण्याची खात्री आहे. एवढेच नाही तर, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप यांच्यासह या सेवांचा फायदा संपूर्ण देशालाही होणार आहे.

तसेच, या उपग्रहामुळे मोबाईल नेटवर्कही अधिक मजबूत होईल. कारण, हा उपग्रह केवळ मोबाईल सिग्नललाच बळकट करणार नाही तर, त्यांची व्याप्तीही अधिक विस्तृत करणार आहे. व्यापक कव्हरेजच्या मदतीने, आता कॅलड्रॉपची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. आता सॅटेलाइटचा मोबाईल सिग्नल मजबूत होत असल्याने, मोबाईल कंपन्या आता टॉवरवरील आपले अवलंबन कमी करू शकतील (ISRO Launched new communication satellite for better quality of television and mobile video quality).

आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठा संचार उपग्रह

भारतातील इनसॅट सिस्टम ही आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठी संचार उपग्रह प्रणाली आहे. सध्या जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये याचे इतर नऊ उपग्रह उपग्रह स्थापित आहेत. भारतीय संचारातील क्रांतीची सुरूवात 1983मध्ये इनसॅट 1बीपासून झाली. यात इनसॅट-3A, 3C, 4A, 4B, 4CR आणि GSAT 6, 7, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 17 आणि 18 उपग्रह आहेत, ज्यात CSM 01, GSAT 12ची जागा घेणार आहे.

INSAT सिस्टममध्ये 200हून अधिक ट्रान्सपाँडर असून, हे सी, एक्सटेंडेड सी आणि कु बँडमध्ये दूरसंचार सेवा प्रदान करतात. या व्यतिरिक्त, दूरदर्शनचे प्रसारण, उपग्रह बातम्या, सामाजिक अनुप्रयोग, हवामान अंदाज, आपत्तीचा अंदाज, तसेच शोध आणि बचाव कार्यासाठी सेवा प्रदान करतात.

(ISRO Launched new communication satellite for better quality of television and mobile video quality)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....