AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेकदा सामूहिक अत्याचार, सिग्नलवर भीक ते मुंबईतील ‘ट्रेन की रेखा’; आज फॅशन ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

'ट्रेन की रेखा' म्हणून ओळख असेल्या तिने लहापणापासून अनेक अत्याचार सहन केले. अनेकदा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाले, सिग्नलवर भीक मागण्याची वेळ आली. पण तिने सर्वांवर मात करत आपली वेगळी ओळख बनवली आणि आज ती एका फॅशन ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. कोण आहे ही 'ट्रेन की रेखा'

अनेकदा सामूहिक अत्याचार, सिग्नलवर भीक ते मुंबईतील 'ट्रेन की रेखा'; आज फॅशन ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
| Updated on: Mar 03, 2025 | 12:49 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील रेखाची कहाणी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण तुम्ही मुंबई लोकल ट्रेनच्या “रेखा” बद्दल कदाचित ऐकलं असेल. पण ही ‘ट्रेन की रेखा’ तशी बरीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही बऱ्याचदा व्हायरल झालेले आहेत. पण तिचा भूतकाळ मात्र तितका चांगला नक्कीच नव्हता. ‘ट्रेन की रेखा’ ही एक ट्रान्सजेंडर आहे. बालपणी गरिबी, बलात्कार, अपमान अशा भयानक त्रासातून ती गेली आहे. मात्र यासर्वांतून मार्ग काढत तिने स्वतःच्या बळावर आपलं करिअर घडवलंय.

‘ट्रेन की रेखा’ची डोळे पाणावणारी कहाणी 

‘ट्रेन की रेखा’ नाव आहे पूजा शर्मा. तिला ज्युनियर रेखा, मुंबईची रेखा किंवा रेखा माँ म्हणून ओळखलं जातं. कारण तिचा पेहराव आणि शृंगार पाहून. तिला अभिनेत्री रेखा फार आवडतात. त्यांच्या साड्यांची ती फॅन आहे. म्हणून ती अगदी त्यांच्यासारखच दिसण्याचा प्रयत्न करते. तशाच भरजरी साड्या, दागिने आणि सुंदर असा साज-शृंगार करून ती असते. म्हणून तिला रेखा असं म्हणतात. पूजाचा जन्म कोलकात्यातील एका गरीब कुटुंबात झाला. ती स्वतः सांगते की तिचे कुटुंब झोपडपट्टीत राहत होते. घरची परिस्थिती अशी होती की जर तुम्ही काम केले तरच तुम्हाला रात्रीचं जेवण मिळेल. अशा परिस्थितीत ती कधी मातीचे भांडे बनवण्याचं काम करायची तर कधी मासळी बाजारात फॉइल विकायची

अनेकवेळा बलात्कार 

तिच्या संघर्षांबद्दल बोलताना, पूजा स्वतः म्हणते की तिच्या लहानपणापासूनच तिच्यासोबत घृणास्पद घटना घडल्या आहेत. तिला तेव्हा या गोष्टीचा अर्थ काय हेही माहित नव्हतं. मग तिला प्रश्न पडला की चॉकलेटच्या बदल्यात इतके दुःख का दिलं जात आहे. मग एके दिवशी तिने ते तिच्या मैत्रिणींना आणि शेजारी राहणाऱ्या बहिणीला सांगितलं. मैत्रिणींचे बॉयफ्रेंडही तिच्याशी वाईट वर्तन केलं आहे. तेव्हा पूजा इतकी घाबरली होती की तिने घराबाहेर पडणंच बंद केलं होतं. तिचे वडील पुजारी आहेत. लोक त्याचा खूप आदर करायचे. म्हणूनच तिला कुटुंबाला त्रास द्यायचा नव्हता.

एका मुलाखतीत पूजाने सांगितले होते की लहानपणी तर समजलं नाही पण ‘आता मला समतंय की जे लहानपणी व्हायचं तो बलात्कार होता.आणि माझ्यावर कितीतरी वेळा सामूहिक बलात्कार झाला आहे. मुलींसोबत असे घृणास्पद कृत्य एक-दोनदा घडते, पण हे कृत्य तिच्यासोबत वारंवार घडल्याचं तिनं सांगितलं.

एनजीओच्या माध्यमातून डान्स ग्रुपमध्ये सामील

पूजा शर्मा एका एनजीओच्या माध्यमातून डान्स ग्रुपमध्ये सामील झाली. त्या पहिल्या डान्स शोसाठी तिला 500 रुपये मिळाले. जेव्हा ती पहिल्यांदाच साडी घालून नृत्यासाठी स्टेजवर आली तेव्हा ती भावनिक झाली. तिच्या नृत्य सादरीकरणाचे खूप कौतुक झालं. तिला वाटलं की हाच आदर तिला हवा होता. या शोनंतर पूजाने तिची खरी ओळख स्वीकारली आणि तिने नवीन आयुष्य सुरू केलं. त्या शोमध्ये मुंबईतील एक प्रसिद्ध ट्रान्सजेंडरही आले होते. पूजाचा डान्स पाहिल्यानंतर त्यांनी तिला मुंबईत येण्याची ऑफर दिली. पूजालाही तो आदर आणि सन्मान आवडला आणि ती मुंबईत गेली आणि एक नवीन ओळख आणि एक नवीन प्रवास सुरू केला. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. सिग्नलवर भीक मागण्यापासून ते ट्रेनमध्ये काम करण्यापर्यंतची सर्व कामं तिने केली. पण तिने कधीही हार मानली नाही.

लोकल ट्रेनच्या महिला कोचमध्ये भीक मागितली 

पूजा मुंबईत पोहोचली तेव्हा त्याच किन्नरने तिला एक यादी दिली होती ज्यामध्ये तिला काय करायला आवडेल याचे पर्याय होते..? सिग्नलवर पैसे मागणे? की ट्रेनमध्ये… ती रात्री उभी राहील, किंवा तिच्या मुलाकडे जाईल. पूजा सांगितलं की तिने ट्रेनचा पर्याय निवडला. पहिल्या दिवशी ती ट्रेनमध्ये चढली तेव्हा लोक तिला रेखा म्हणू लागले. ती भीक मागते यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता. सर्वांना तिचा पेहराव खूप आवडला. ती दररोज मुंबई लोकल ट्रेनच्या महिला कोचमधून प्रवास करायची. जिथे ती नाचत असे आणि लोकांकडून पैसे मागत असे. एके दिवशी कोणीतरी तिचा हा डान्स व्हिडीओ शेअर केला आणि ती क्लिप व्हायरल झाली.

अन् आज एका फॅशन ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

पूजा शर्मा सांगते की त्या व्हिडिओनंतर लोकांनी तिची तुलना रेखाशी करायला सुरुवात केली. तिला सिल्कच्या साड्या आण दागिने घालायला आवडतात. मग ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये रेखाजी बनली. नंतर, ती सोशल मीडिया आणि यूट्यूबवर खूप प्रसिद्ध झाली. अनेक संस्थांनी तिला पुरस्कार देऊन सन्मानितही केलं. पूजा शर्माने सांगितलं की ती आता एका फॅशन ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. एवढंच नाही तर पूजाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एके दिवशी तिला अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही फोन आला होता. सुरुवातीला तिला वाटलं की कोणीतरी नक्कीच तिला त्रास देत आहे. पण खरंच तिला माधुरीचा कॉल आलेला. माधुरीने तिला ‘डान्स दिवाने-3’ हा रिअॅलिटी शो ऑफर केला होता.

 

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.