AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय मस्त दिसताय, सोज्वळ मास्तरीण…, शिवानी रांगोळेच्या स्विमिंग पूलमध्ये दिलखेच अदा

Shivani Rangole Kulkarni | शिवानी रांगोळेच्या स्विमिंग पूलमध्ये दिलखेच अदा, फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका... सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त शिवानी हिच्या फोटोची चर्चा... चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव... पाहा फोटो...

काय मस्त दिसताय, सोज्वळ मास्तरीण..., शिवानी रांगोळेच्या स्विमिंग पूलमध्ये दिलखेच अदा
| Updated on: May 07, 2024 | 10:25 AM
Share

मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे कायम तिच्या लूक आणि अभिनयामुळे चर्चेत असते. पण आता शिवानी तिच्या अभिनयामुळे नाहीतर, एका खास फोटोमुळे चर्चेत आली आहे. सध्या शिवानी हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा फोटो प्रचंड आवडला आहे. शिवानी हिने स्विमिंग पूलमधील स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, शिवानी सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारत आहे. अक्षराच्या भूमिकेत दिसणाऱ्या शिवानी हिचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. साडी, दागिने, हातात बांगड्या अशा लूकमध्ये दिसणाऱ्या शिवानी हिला नव्या लूकमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकला आहे.

स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट करत शिवानी हिने कॅप्शनमध्ये ‘स्विमिंग पूलमधून सूर्यास्त पाहण्याचा आनंदा वेगळाच असतो…’ असं लिहिलं आहे.शिवानी हिचा फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत आहेत. एक नेटकरी शिवानी हिच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘आई साहेब मारतील की…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मास्तरीन बाई…’, तिसरा नेटकरी म्हणाला, “काय मस्त दिसताय…सोज्वळ मास्तरीण बाई” सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिवानी हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

शिवानी हिने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या शिवानी ‘मास्तरीण बाई…’ म्हणून चर्चेत आहे. ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’ या मालिकांमध्ये देखील शिवानी हिने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

शिवानी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शिवानी हिने 2022 मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णी याच्यासोबत लग्न केलं. विराजस – शिवानी यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. शिवानी पती विराजस याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र