हिंदू असल्याचं सांगत अभिनेत्रीची फसवणूक… लग्नानंतर इस्लाम स्वीकारण्यास बळजबरी… बेदम मारहाण आणि…
Actress Life : हिंदू असल्याचं सांगत केली फसवणूक... लग्नानंतर मानसिक आणि शारीरिक शोषण... इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजबरी... अभिनेत्रीने थेट मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Actress Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केलं आणि आज त्या पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. या यादीमध्ये अभिनेत्री करीना कपूर पासून सोनाक्षी सिन्हा हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी मुस्लीम पुरुषासोबत लग्न केलं आणि सुखी संसार रचला… पण काही अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ आलं… मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्यामुळे अभिनेत्रींना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या… एका अभिनेत्रीची फसवणुक करण्यात आली… हिंदू असल्याचं सांगत त्याने अभिनेत्रीसोबत लग्न केलं आणि त्यानंतर तिचा छळ केला…
पुरुषाने सुरुवातील हिंदू असल्याचं सांगत अभिनेत्रीसोबत लग्न केलं. त्यानंतर तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यास दबाव टाकला… यादरम्यान, त्याने अभिनेत्रीला मारहाण देखील केली… आयुष्यात हे भयानक अनुभवणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्रिती तलरेजा आहे… ‘कृष्णा दासी’ सिनेमात प्रिती हिने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती…
प्रिती हिने सांगितल्यानुसार, तिने अभिजीत पेटकर नावाच्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं. पण लग्नानंतर प्रिती हिने 2021 मध्ये पती विरोधात तक्रार दाखल केली… प्रिती हिने पतीवर गंभीर आरोप केले होते… तक्रारीत प्रिती हिने म्हटल्यानुसार, अभिजीत याने हिंदू सांगत लग्न केलं. पण तो मुस्लीम आहे… प्रिती हिने कल्याण खडकपाडा पोलिसांत तक्रार देखील दाखल केली…
धर्म बदलण्यासाठी मारहाण…
सुरुवातीला प्रिती हिच्यापासून पतीने स्वतःची ओळख लपवली. पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा त्याने मशिदीत जात निकाह केला आणि मुस्लिम कायद्याअंतर्गत मशिदीतून सर्टिफिकेट मिळणार होतं. पण ते मिळालं नाही… एवढंच नाही तर, पतीने केलेल्या मारहाणीनंतर प्रिती हिच्या शरीरावर जखमा देखील होत्या. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट केले आहे. प्रितीला वेदना असह्य झाल्या तेव्हा तिने मुख्यमंत्र्यांकडे मदत देखील मागितली…
ट्विटवर पोस्ट करत प्रिती म्हणाली, ‘तो म्हणतो की मी मुस्लिम आहे… पण धर्मांतर केल्याचा त्याच्याकडे कोणताच पुरावा नाही… स्वतःचं नाव अभिजीत पेटकर लिहितो… त्याने तब्बल तीन वर्ष माझी फसवणूक केली…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
