Crime Patrol Satark : ‘क्राईम पेट्रोल’ची नवी होस्ट, महिलांविरुद्धच्या अन्यायाला वाचा फोडणार ‘ही’ प्रख्यात अभिनेत्री!

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिव्यांका ‘क्राइम पेट्रोल सतर्क’चा नवा चेहरा म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे.

Crime Patrol Satark : 'क्राईम पेट्रोल'ची नवी होस्ट, महिलांविरुद्धच्या अन्यायाला वाचा फोडणार 'ही' प्रख्यात अभिनेत्री!

मुंबई : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला (Divyanka Tripathi To Host Crime Patrol Satark) प्रेक्षकांनी सून आणि मुलीच्या भूमिकेत खूप प्रेम दिलं. मात्र, यंदा दिव्यांका एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. दिव्यांका त्या महिलांची कहाणी घेवून येत आहे ज्यांनी अन्यायाविरोधात आपला आवाज उठवला. सोनी टीव्हीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिव्यांका ‘क्राइम पेट्रोल सतर्क’चा नवा चेहरा म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. या प्रोमोसोबत “#WomenAgainstCrime दिव्यांका त्रिपाठीसोबत” असं कॅप्शन देण्यात आलं आहे (Divyanka Tripathi To Host Crime Patrol Satark).

हा क्राईम टीव्ही शो सर्वात लोकप्रिय शोजपैकी एक आहे. क्राईम पेट्रोलने आतापर्यंत लोकांना भारताचा तो चेहरा दाखवला आहे, जो आम्हाला कधीही बघायचा नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोचे पूर्वीचे होस्ट अनुप सोनी यांचा ‘सावधान रहिए, सतर्क रहिए’ हा डायलॉग सर्वांना तोंडपाठ होता. आता ‘न सहमेंगी, न डरेंगी, न रुकेंगी, जाग जाग नारी तू, एक औरत पर वार अब हर औरत का भार’ या नवीन घोषवाक्यासह हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

कधीपासून सुरु होणार

21 डिसेंबरपासून दिव्यांका त्रिपाठी क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. प्रोमोमध्ये दिव्यांका स्त्रियांना जागरुक होण्याचा संदेश देत आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं आव्हान देत आहे. तिचा हा प्रोमो अत्यंत प्रभावशाली आहे.

रील नाही तर रिअल लाईफमध्येही दिव्यांता नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवते. ती तिच्या ट्विटर हँडलवर नेहमी तिचे विचार उघडपणे बोलून दाखवते.

वाढदिवसाच्या दिवशी फॅन्सना भेट

दिव्यांका त्रिपाठीचा 14 डिसेंबरला वाढदिवस होता. तिची लोकप्रिय मालिका ये है मोहब्बते ऑफ एअर गेल्यानंतर प्रेक्षक तिच्या नवीन शोसाठी अत्यंत उत्सुक होते. तिच्या वाढदिवशीच तिने आपल्या फॅन्सना हे गिफ्ट दिलं आहे.

Divyanka Tripathi To Host Crime Patrol Satark

संबंधित बातम्या :

ऋतिक-कंगना प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे

Remo D’Souza | नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने सर्जरीनंतर केला ‘डान्स’ तुफान व्हायरल होतोय तो व्हिडिओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI