ऋतिक-कंगना प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे

ऋतिक-कंगना प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनौत प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटकडे वर्ग करण्यात आला आहे.

अक्षय चोरगे

|

Dec 14, 2020 | 11:51 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनौत प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेच्या (Crime Branch) सीआययू युनिटकडे (Criminal Interdiction Unit) सोपवण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंगना रनौतने ऋतिक रोशनची बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी 2016 साली तिच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. सायबर सेलकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु आता हा तपास गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटकडे वळवण्यात आला आहे. सायबर सेलनेच तपासानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलं आहे.

कंगना रनौत आणि ऋतिक रोशनचा वाद अनेकजण विसरले नसतील, हे प्रकरण किमान ऋतिक-कंगनाच्या चाहत्यांच्या तरी लक्षात असेलच तीन-चार वर्षांपूर्वी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे. केवळ बोललीच नाही तर ऋतिकबद्दल मनात असलेली सगळी भडास तिने बाहेर काढली होती. कंगनाने त्यावेळी अनेकदा ऋतिकवरील आरोपांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. कंगनाने माध्यमासमोर हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते.

‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान ऋतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र ऋतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली. या वादात त्यावेळी अनेकांनी कंगनाची बाजू घेत ऋतिकवर टीका केली होती. तर ऋतिकचे चाहते ऋतिकच्या बाजून होते. काही वेळाने कंगनाने दररोज ऋतिकवर हल्लाबोल सुरु ठेवला, ऋतिकने मात्र त्यावर उत्तर देण्याऐवजी मौन बाळगत केवळ आपल्या कामाकडे लक्ष दिले.

नेटीझन्सनी ऋतिकची माफी मागितली

ट्विटरवर कधीही कोणतीही गोष्ट ट्रेण्ड होऊ शकते. दोन आठवड्यांपूर्वी ट्विटरवर अनेक नेटिझन्सनी बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची माफी मागितली होती. तीन वर्षांपूर्वी कंगना-ऋतिकने त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर मांडला होता. कंगनाने माध्यमांसमोर ऋतिकबद्दल, त्यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल, ऋतिकच्या कुटुंबियांबद्दल अनेक वक्तव्ये केली होती. अनेकांनी या दोघांच्या वादात कंगनाचं समर्थन केलं होतं. अनेकांना कंगना पीडित असल्याचं वाटत होतं. परंतु कंगनाचा मोर्चा केवळ ऋतिकपुरता मर्यादित नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये कंगनाने सिनेजगतातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींशी पंगा घेतला आहे. दर काही दिवसांनी कंगना एखाद्या व्यक्तीला सोशल मीडियावरुन टार्गेट करत असते. कंगनाच्या चाहत्यांसाठी तसेच तिच्या ट्रोलर्ससाठी हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे कंगना-ऋतिकच्या वादात ज्यांनी पूर्वी कंगनाची बाजू घेतली होती. त्यांना आता असं वाटतंय की ऋतिकची काही चूक नव्हती. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियाद्वारे ऋतिकची माफी मागितली होती.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut | कंगना रनौतचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल, पाहा काय आहे प्रकरण!

Google Search | गूगल इंडियाची यादी जाहिर, ‘कंगना रनौत’ दहाव्या क्रमांकावर फेकली गेली!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें