AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारी ‘त्या’ इंटिमेट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत म्हणाली…

Shweta Tiwari | इंटिमेट सीन पाहिल्यानंतर दुटप्पी भूमिका मांडणाऱ्या लोकांना श्वेता तिवारी हिचं सडेतोड उत्तर, 'त्या' सीनमुळे आली चर्चेत... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा...

श्वेता तिवारी 'त्या' इंटिमेट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत म्हणाली...
| Updated on: Apr 29, 2024 | 4:17 PM
Share

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री अभिनय विश्वात सक्रिय आहे. नुकताच, अभिनेत्री एका वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. ‘हम तुम और देम’ असं सीरिजचं नाव होतं. सीरिजमध्ये श्वेता तिवारी हिने अभिनेता अक्षय तिवारी याच्यासोबत काही इंटिमेट सीन दिले होते. श्वेता तिवारी हिचा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

सीरिजमध्ये इंटिमेट सीन दिल्यामुळे श्वेता तिवारी हिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘जी लोकं अश्लीलता पाहतात तीच लोकं विरोध करत असतात. अशीच लोकं नेटफ्लिक्सवर जाऊन हॉलिवूड शो पाहातात.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘विरोध करणारेच परदेशात तयार होणारे बोल्ड शो पाहात असतात. दुसऱ्या भाषेत असणाऱ्या शोची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शोमधील हा पार्ट नक्की पाहा… तो पार्ट नक्की पाहा… असं बोलत असतात आणि माझं काम त्यांना चुकीचं वाटतं… हेच शो तुम्ही भारतात बनवत असाल तर तुम्ही अश्लील झालात…’

‘दोन्ही बाजूने बोलणारे लोक आपल्या समाजात आहेत. दुटप्पी भूमिका मांडणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिने इंटिमेट सीनवर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यानंतर श्वेता तिवारी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘बिग बॉस’त्या ट्रॉफीवर देखील अभिनेत्रीने स्वतःचं नाव कोरलं. श्वेता हिला खासगी आयुष्यात यश मिळालं. पण अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्याचं सुख फार काळ अनुभवता आलं नाही. अभिनेत्रीने दोन वेळा संसार थाटला. पण अभिनेत्रीचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीची मुलगी पलक तिवारी हिने देखील ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता