Video : उर्फी जावेद चक्क ‘या’ ड्रेसमध्ये पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला, लोक हैराण, तो व्हिडीओ व्हायरल
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

मुंबई : उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. मात्र, असे असतानाही उर्फी जावेद हिला फाॅलो (follow) करणाऱ्यांची संख्या देखील जबरदस्त आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. मात्र, तिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूच मिळालीये.
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे कठीण आहे. काही दिवसांपूर्वीच जाळीच्या ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यावर फिरताना उर्फी जावेद दिसली. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिचा तो लूक पाहून सर्वजण हैराण झाले. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
उर्फी जावेद हिला नेहमीच कपड्यामुळे सुनावले जाते. मात्र, याचा काहीच परिणाम हा उर्फी जावेदवर होत नाही. नुकताच आता उर्फी जावेद ही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहचलीये. गेल्याच आठवड्यामध्ये उर्फी जावेद ही मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहचली. यावेळी तिच्या लूकची चर्चा रंगली. आता सिद्धीविनायक मंदिरानंतर उर्फी जावेद ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहचली.
View this post on Instagram
यावेळी उर्फी जावेद ही वेगळ्या लूकमध्ये दिसली. उर्फी जावेद हिने लांब ओढणी डोक्यावर घेतल्याचे दिसले. यावेळी आपली पॅन्ट हातामध्ये घेताना देखील उर्फी जावेद ही दिसली. उर्फी जावेद ही पापाराझी यांना बोलताना दिसली. उर्फी जावेद हिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला. आता उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद हिच्या लूकपेक्षा तिच्या ओढणीची जास्त चर्चा होताना दिसतंय.
उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, किमान देवाच्या दर्शनाला जाण्यासाठी तरी ही व्यवस्थित कपडे घालते याचा आनंद आहे. दुसऱ्याने लिहिले की, मी पहिल्यांदाच उर्फी जावेद हिला अशा चांगल्या कपड्यांमध्ये बघितले. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.