AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्धर आजाराशी झुंज सुरू असतानाच हार्ट अ‍ॅटॅक, घराघरात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रीचं निधन

रदर्शनवरील प्रसिद्ध मालिका 'उडान' ही देखील त्यापैकीच एक. या मालिकेतील कथा, तसेच त्यातील पात्रांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते. या मालिकेत अभिनेत्री कविता चौधरी यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका साकारली होती.

दुर्धर आजाराशी झुंज सुरू असतानाच हार्ट अ‍ॅटॅक, घराघरात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रीचं निधन
| Updated on: Feb 17, 2024 | 9:32 AM
Share

Kavita Chaudhary | छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका झाल्या, ज्यांनी जनसामान्यांच्या आयुष्यात आपले खास स्थान निर्माण केलं. दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘उडान’ ही देखील त्यापैकीच एक. या मालिकेतील कथा, तसेच त्यातील पात्रांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते. या मालिकेत अभिनेत्री कविता चौधरी यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका साकारली होती. मात्र कविता चौधरीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘उडान’ फेम कविता चौधरी यांचे हार्ट अॅटकमुळे निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

गुरूवारी रात्री झाला मृत्यू

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कविता चौधरीचा बॅचमेट असलेला अभिनेता अनंग देसाई यांनी कविता चौधरीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला. गेल्या तीन-चार दिवसांपासून कविता चौधरी यांना अमृतसरमधील पार्वतीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी रात्री 8.30 वाजता त्यांनी अमृतसरमधील याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, असे कविता यांचा पुतण्या अजय सायल यांनी सांगितलं.

त्यांचे जवळचे मित्र आणि कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत कविता यांना श्रद्धांजली वाहिली. रिपोर्ट्सनुसार, कविता चौधरी या गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होत्या. त्यांच्यावर दीर्घकाळ कर्करोगावर उपचारही सुरू होते. अमृतसरमध्येच कविता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘उडान’ मुळे मिळाली ओळख

‘उडान’ ही मालिका 1989 मध्ये प्रसारित झाली होती. कविताने या शोमध्ये आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारली होती. या शोचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. हा शो त्यांची बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होता, ती किरण बेदीनंतर दुसरी आयपीएस अधिकारी बनली होती. चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्यांचे फारसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे कविता त्यांच्या उडान शोद्वारे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण बनल्या. नंतर त्यांनी ‘युअर ऑनर’ आणि ‘आयपीएस डायरीज’ सारख्या शोची निर्मिती केली.

‘सर्फ’ च्या जाहिरातीमुळेही झाल्या प्रसिद्ध

1980 आणि 1990 च्या दशकात प्रसिद्ध सर्फ ब्रँडच्या जाहिरातींमध्ये ललिताजींची भूमिका साकारण्यासाठीही कविता प्रसिद्ध होत्या. या जाहिरातीमध्ये त्यांनी एका बुद्धिमान गृहिणीची भूमिका साकारली. त्या जाहिरातीमुळेही त्या बऱ्याच लोकप्रिय झाल्या.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.