Uorfi Javed | उर्फी जावेदचे मोठे विधान, म्हणाली, मी एक महिला म्हणून घेण्याच्या लायकीची नाही, समाजासाठी एक डाग
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेदला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांमधून केलीये. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंगमध्ये (Fan following) एखाद्या बाॅलिवूड अभिनेत्रीला देखील आराम उर्फी जावेद मागे टाकते. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे टीका केली जाते. बऱ्याच वेळा लोक उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील देतात.
उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून काही वर्षांपूर्वी ती मुंबईत दाखल झालीये. मुंबईत आल्यानंतर सुरूवातीच्या दिवसांमध्ये उर्फी जावेद हिने मोठा संघर्ष केला आहे. इतकेच नाही तर पैसे नसल्याने मुंबईतील रस्त्यावर आणि गार्डनमध्ये झोपण्याची वेळ उर्फी जावेद हिच्यावर आली. वडील देखील उर्फी जावेद हिला खूप जास्त मारहाण करायचे.
नुकताच उर्फी जावेद हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने काही मोठे खुलासे केले असून लोक आपल्याबद्दल काय बोलतात आणि त्यानंतर आपल्याला नेमके काय वाटते हे सांगताना उर्फी जावेद ही दिसली आहे. उर्फी जावेद म्हणाली की, लोक नेहमीच माझ्याबद्दल वाईट बोलतात. त्यांना वाटते की, मी तरूण पिढीसाठी अत्यंत वाईट उदाहरण आहे.
मी बऱ्याच वेळा तोच विचार करते की, मी समाजासाठी नक्कीच एक धब्बा आहे. मी एक महिला म्हणून घेण्याच्या देखील लायकीची नाहीये, खरोखरच लोक माझ्याबद्दल बरोबर बोलतात. हे सर्वकाही खरे आहे पण माझ्याकडे आता परत जाण्याचा मार्ग हा अजिबातच नाहीये. मी आता परत कधीच जाऊ शकत नाही. मला वाटते की, मी जर हे सर्व सोडून दिले तर माझ्यासाठी परत जाणे शक्य नाहीये.
कारण हे सर्व सोशल मीडियावर तर कायमच राहणार आहे. मला हे देखील माहिती आहे की, कोणतेच कुटुंबिय मला कधी स्वीकारणार नाहीयेत. मी खरोखर खूप जास्त वाईट असल्याचे देखील उर्फी जावेद हिने म्हटले आहे. आता उर्फी जावेद हिने केलेल्या या भाष्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. उर्फी हिने अनेक वर्षांनंतर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
