Uorfi Javed | ‘या’ बाॅलिवूडच्या चित्रपटात धमाका करताना दिसणार उर्फी जावेद, ‘या’ निर्मात्याने दिली सुवर्णसंधी
उर्फी जावेद हिने कमी कालावधीमध्ये एका खास ओळख मिळवली आहे. सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नक्कीच आहे.

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. मात्र, अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद हिच्यावर होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम होत नाही. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) असून काही वर्षांपूर्वी तिने अभिनयासाठी मुंबई गाठली. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच (Bigg Boss OTT) मिळाली.
उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यापासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद अतरंगी कपडे घालते. काही दिवसांपूर्वी चक्क झाडाच्या सालीपासून तयार केलेले कपडे हे उर्फी जावेद हिने घातले होते. उर्फी जावेद हिच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये काही महिलांनी थेट मोर्चा काढला होता. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.
नुकताच एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. उर्फी जावेद ही आता लवकरच बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे चक्क एकता कपूर हिच्या चित्रपटामध्ये उर्फी जावेद ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उर्फी जावेद हिला एकता कपूर बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करत आहे. यामुळे आता उर्फी जावेद हिचे चाहते आनंदात बघायला मिळत आहेत.
उर्फी जावेद ही एकता कपूर हिच्या लव, सेक्स और धोखा 2 या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी उर्फी जावेद हिला आॅफर देण्यात आली असून चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी उर्फी जावेद फिट बसत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिने देखील या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळत आहे.
लव, सेक्स और धोखा 2 चित्रपटाचे शूटिंगही लवकर सुरू केले जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद ही सांगताना दिसली होती की, मला वाटत नाही की मला कधी बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम मिळेल. कारण तेथील लोक माझा तिरस्कार करतात. मात्र, आता थेट एकता कपूर हिच्या चित्रपटात काम करण्याची संधी उर्फीला मिळालीये.
