AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed | उर्फी जावेदची आतापर्यंतची सर्वांत विचित्र फॅशन; नवा कारनामा पाहून भडकले नेटकरी

'उर्फीला कपडे आणि मानसोपचाराचीही फार गरज आहे', असंही काहींनी म्हटलं आहे. उर्फीचं हे फॅशन आतापर्यंतचं सर्वांत विचित्र फॅशन असेल, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

Urfi Javed | उर्फी जावेदची आतापर्यंतची सर्वांत विचित्र फॅशन; नवा कारनामा पाहून भडकले नेटकरी
Urfi javedImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2023 | 11:50 AM
Share

मुंबई : चित्रविचित्र फॅशन आणि अभिनेत्री उर्फी जावेद हे समीकरण नेटकऱ्यांना दररोज सोशल मीडियावर पहायला मिळतं. हल्ली पापाराझींच्याही सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसिद्धीसाठी उर्फीचे व्हिडीओ पोस्ट केले जातात. चित्रविचित्र फॅशनसोबतच उर्फी अंगप्रदर्शनामुळे अनेकदा ट्रोल होते. आता नुकताच तिने तिच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नवीन प्रयोग करताना दिसतेय. मात्र तिच्या प्रयोगाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. व्हिडीओ पाहताच अनेकांनी तिच्यावर टीका करण्यात सुरुवात केली. यावेळी उर्फीने कोणत्याही वस्तूपासून तिचा ड्रेस बनवला नाही. तर तिने अंगावरच काहीतरी लावून घेण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उर्फी नक्की काय करतेय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उर्फीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत काही महिलासुद्धा दिसत आहेत. या महिला उर्फीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा पेस्ट लावत आहेत. यासोबतच तिने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्येही तिच्या शरीरावर पोस्ट लावल्याचं दिसून येत आहे. ‘काहीतरी हटके येणार आहे, प्रतीक्षा करा..’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. आता उर्फी कोणती अजब गोष्ट करू शकते, हे फक्त तीच सांगू शकते. मात्र या व्हिडीओवरून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

‘या मुलीने देशाच्या संस्कृतीची ऐशीची तैशी केली आहे’, असं एकाने लिहिलं. तर अनेकांनी व्हिडीओवर डिस्लाइक (नावडल्याचं) बटण असलं तर बरं झालं असतं, असं म्हटलंय. ‘ही तर हद्दच झाली’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘उर्फीला कपडे आणि मानसोपचाराचीही फार गरज आहे’, असंही काहींनी म्हटलं आहे. उर्फीचं हे फॅशन आतापर्यंतचं सर्वांत विचित्र फॅशन असेल, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे फक्त नेटकऱ्यांचंच नाही तर सेलिब्रिटींचंही लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री करीना कपूरने उर्फीचं कौतुक केलं होतं. उर्फीच्या बोल्ड फॅशनबद्दल तुला काय वाटतं असा प्रश्न करीनाला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “फॅशन म्हणजे व्यक्त होणं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. माझ्या मते उर्फीमध्ये हाच आत्मविश्वास आहे आणि त्यात आत्मविश्वासाने ती कपडे घालते. मला ती खूपच कूल वाटते.”

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.