AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे…’, मुंबईमध्ये भाड्याने राहणं उर्फी जावेद हिच्यासाठी कठीण

बेघर झाली उर्फी ! मुंबई याठिकाणी राहण्यासाठी उर्फी जावेद हिला करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना... मुंबईमध्ये राहण्यासाठी घर मिळत नसल्याचं मुख्य कारण उर्फीने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं

'मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे...', मुंबईमध्ये भाड्याने राहणं उर्फी जावेद हिच्यासाठी कठीण
'मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे...', मुंबईमध्ये भाड्याने राहणं उर्फी जावेद हिच्यासाठी कठीणImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 25, 2023 | 8:44 AM
Share

Urfi Javed Not Getting home On Rent : मॉडेल आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद काधी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे उर्फी ट्रोलिंगला बळी पडते. उर्फी कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तर कधी मुंबईच्या रस्त्यांवर पापाराझींना पोज देताना दिसते. पण आता उर्फीला मुंबई याठिकाणी राहणं देखील कठीण झालं आहे. कारण मॉडेलला मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहण्यासाठी भाड्याने देखील घर मिळायला अडचणी येत आहेत.

मुंबईमध्ये भाड्याने घर मिळत नसल्याचा खुलासा उर्फीने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. उर्फीला घर देण्यासाठी कोणी तयार नाही. मुंबईमध्ये घर का मिळत नाही, यामागील मोठं कारण खुद्द उर्फीने सांगितलं आहे. तोकड्या कपड्यांमुळे आणि मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे मुंबईमध्ये राहण्यासाठी घर मिळत नसल्याचं मुख्य कारण उर्फीने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘मी ज्याप्रकारचे कपडे घालते, त्यामुळे मुस्लिम घर मालक मला घर भाड्याने देत नाही. हिंदू घर मालक मी मुस्लिम असल्यामुळे मला घर देत नाहीत, तर मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे काही घर मालक भड्याने घर देण्यास नकार देत आहेत. मुंबईत भाड्याने अपार्टमेंट शोधनं फार कठीण आहे.’ सध्या उर्फीने केलेलं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Urfi Javed Comment

ट्विटनंतर उर्फी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या ट्विटवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘हे चुकीचं आहे.’ तर दुसरा युजर ‘खंबीर राहा…’ असं म्हणाला असून अन्य एक युजर ‘कर्म’ म्हणत उर्फीला ट्रोल केलं. सध्या सर्वत्र उर्फीच्या ट्विटची चर्चा आहे.

उर्फी जावेद कायम तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. करियरला सुरुवात केल्यानंतर मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’ मुळे चर्चेत आली. पण ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये देखील उर्फीला लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर उर्फीची फॅशनच तिची ओळख झाली. पण उर्फी आता तिच्या ओळखीमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.