अनुष्का शर्मासारखीच दिसते लेक वामिका? व्हायरल फोटोची चर्चा
सध्या सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काची लेक वामिकाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती अनुष्काची कॉपीच वाटत आहे. सध्या या फोटोची जोरदार चर्चा होत आहे. पण या फोटोमागे एक कारण लपलेलं आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ग्लॅमरस जगापासून दूर असले तरी देखील ते सतत काहीना काहीन कारणांनी चर्चेत असतात. तसेच ते कॅमेऱ्यासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत. पण त्यात ते स्वत:च्या मुलांबाबत मात्र त्यांची प्रायव्हसी जपतात. ते कधीच त्यांच्या मुलांचे चेहरे कॅमेऱ्यासमोर दाखवत नाही. किंवा त्यांच्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. ते आपल्या मुलांना या सोशल मीडियापासून जेवढे शक्य आहे तेवढे लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकायचा चेहरा मीडियासमोर येऊ देत नाहीत.
मुलगी वामिका कोहलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल
मात्र आता त्यांची मुलगी वामिका कोहलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती विराटच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. आणि मुख्य म्हणजे वामिका ही आई अनुष्कासारखीच दिसत असल्याचंही लक्षात येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका फॅन पेजने हा फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केला आहे. काही नेटकरी याला वामिकाची पहिली झलक मानत आहेत. पण जर हा फोटो पाहून तुम्हीही गोंधळला असाल तर हे लक्षात घ्या की हा खरा फोटो नसून हा फोटो एआयने बनवलेला आहे. प्रत्यक्षात वामिका अशी दिसत नाही. पण या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळतानाही पाहायाल मिळत आहे. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, अनुष्का आणि विराट त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे वामिका आणि अकाय यांना सामान्य जीवन देऊ इच्छितात. म्हणूनच ते दोघेही परदेशात राहत आहेत.
- virat anushka
याबाबत अनुष्का काय म्हणाली होती?
एका मुलाखतीत अनुष्काने स्पष्ट केलं होतं की, ती मुलांना सोशल मीडिया आणि लोकांच्या नजरेपासून दूर ठेवेल. “आम्हाला आमची मुले लहानपणापासूनच सेलिब्रिटी किड्स ही ओळख घेऊन वाढू इच्छित नाहीत. त्यांनी कॅमेऱ्यासमोर यायचे की नाही हा त्यांचा निर्णय असावा. जेव्हा ते मोठे होतील तेव्हा. आणि जर त्यावेळी त्यांना कॅमेऱ्यासमोर यायचे असेल तर ते तसे करू शकतात.”
परिपूर्ण पालक होण्याचा दबाव?
अनुष्काने एक परिपूर्ण पालक होण्याच्या दबावाबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “सर्वकाळ चांगले दिसणे किंवा चांगले वागणे आवश्यक नाही. आपण आपल्या मुलांना दाखवून दिले पाहिजे की आपणही माणूस आहोत आणि चुका करतो.”
लग्न 2017 मध्ये झाले होते.
विराट आणि अनुष्काचा विवाह 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या फ्लोरेन्स येथे झाला. मुलगी वामिका यांचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी आणि मुलगा अके यांचा जन्म 15 फेब्रुवारी 2014 रोजी झाला. दोघेही आतापर्यंत कॅमेऱ्यापासून दूर आहेत आणि त्यांना सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्याचा या जोडप्याचा मानस आहे.