निवडणुकीच्या धामधूमीत आता ‘वर्गमंत्री’ निवडणुकीचा कल्ला; पहा ट्रेलर

'वर्गमंत्री' या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे हे कलाकार यात मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.

निवडणुकीच्या धामधूमीत आता 'वर्गमंत्री' निवडणुकीचा कल्ला; पहा ट्रेलर
वर्गमंत्रीचा ट्रेलर लाँचImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 9:32 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता शाळेतील वर्गमंत्री निवडणुकीचा कल्ला होणार आहे. मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे ‘वर्गमंत्री’ या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून यात अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 8 नोव्हेंबरपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नागरिकशास्त्राचे धडे मिळावेत, लोकशाही प्रक्रिया समजावी यासाठी शाळांमध्ये निवडणूक घेतली जाते. अशीच वर्गमंत्रीपदासाठीची निवडणूक घेण्याचं शाळेत ठरवलं जातं. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी, अर्ज भरणे, प्रचार, मतदान अशा सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल ‘वर्गमंत्री’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरमधूनच ही सीरिज मनोरंजक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मराठी वेब विश्वात खास रे टीव्हीची वेगळी ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचा अस्सल मराठी कंटेट खास रे टीव्हीनं आजवर सादर केला आहे.

पहा ट्रेलर

हे सुद्धा वाचा

या ट्रेलरची सुरुवातच मॉनिटरच्या निवडणुकीच्या घोषणेने होते. त्यानंतर निवडणुकीसाठी केला प्रचार, शिक्षकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांमध्ये होणारी भांडणं या सर्व घटनांची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकशाही समजावण्याचा भारी मार्ग निवडला, असं एकाने लिहिलंय. तर शाळेचे दिवस आठवले. तो वर्ग, हाताने बनवलेले बोर्ड, सर्व काही खूप सुंदर दिसतंय, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे नरेंद्र फिरोदिया यांनी ‘वर्गमंत्री’ या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. संजय श्रीधर कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं लेखन संजय, अजिंक्य म्हाडगूत, संकेत हेगाणा, प्रवीण कांबळे यांचं आहे. कृष्णा जन्नू यांनी संकलन, अजय घाडगे यांनी छायांकन, निरंजन पाडगावकर यांनी संगीत, श्रेयस एरंडे यांनी पार्श्वसंगीत, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.